World Handicapped Day Dainik Gomantak
गोवा

World Handicapped Day: सहानुभूती नको, सहानुभाव असावा

World Handicapped Day: दिव्‍यांगांच्‍या जीवनातील सबलीकरणासाठी त्यांना योग्य शिक्षण-प्रशिक्षण मिळायला हवे.

दैनिक गोमन्तक

Handicapped Day: जागतिक दिव्यांगांचा दिवस हा गेली ३० वर्षे साजरा केला जातो. आपण भाषिक, सांस्कृितीक,अन्न, धार्मिक अशा विविधता साजऱ्या करतो. दिव्यांगपणा ही अशीच माणसांतील विविधता. शारीरिक अथवा मानसिक वेगळेपण असलेली; पण आपल्यासारखीच हाडा-मासाची, भावना-विचार असलेली ही माणसे.

त्यामुळे चुकीच्या परंपरेने आपल्यात असलेली ‘ती आणि आपण’ ही वेगळेपणाची भावना त्यागून आपण सर्व एकाच समतेच्या भावनेने बांधलेली माणसे, ही सर्वसमावेशकतेची भावना समाजात रुजवण्याचा हा दिवस आणि त्यांच्या दैनंदिन खडतर जीवनात त्यांना साथ देण्याचा संकल्प करण्याचा हा दिवस.

कांही डिसेबिलिटीज आपल्या डोळ्यांना दिसतात, ज्यांत शारीरिक दिव्यांगत्वाचा समावेश होतो. परंतु बऱ्याच डिसेबिलिटीज मानसिक असतात, ज्यांत त्या व्यक्तींचा मेंदू वेगळ्या पद्धतीने काम करत असतो. आजच्या दिवशी सदृश्‍य दिव्यांगत्वांबरोबर अशा अदृश्‍य दिव्यांगत्व असलेल्या माणसांकडेही आपण सजगतेने व आपुलकीने पाहायला, व्यवहार करायला शिकायचे असते.

हा दिव्यांग दिवस अथवा सप्तक साजरे केले म्हणजे झाले, असे होत नाही. हा दिवस अथवा सप्तकांतून आपल्या जाणीवा वाढवून अशा व्यक्ती आणि त्यांचे कुटुंबीय यांना आपण सहसंवेदनेचा हात व दिलासा कायम देण्यास कटिबद्ध व्हायचे असते.

आपल्याला एखादा दृष्टिबाधीत तरुण हातातील व्हायटकेनच्या आधाराने रस्ता ओलांडताना दिसतो, अथवा एखादी छोटी मुलगी व्हीलचेअरवर दिसते, तेव्हा ‘बिचारा, बिचारी’ अशी भावना मनात येणे अथवा ओठांवर येणे याला ‘दया भावना’ म्हणतात. आज शिक्षण, तंत्रज्ञान व त्यामुळे येणारा आत्मविश्‍वास यांच्या जोरवर असे दिव्यांगजन आपल्या पायांवर उभे राहाण्यास धडपडत असतात. त्यांना आपली ‘दया’ मुळीच नको असते.

प्रसिद्ध उर्दू कवी अहमद नादीम कज्मी यांनी म्हटलंय, ‘यह जज्बा हमदर्दीसे बढकर होता है। किसीके दर्दको समझनेसे बेहतर होता है। सारे जहां का दर्द जब अपना लगने लगता है। और खुद का गम सबसे कम लगता है।...’ यालाच म्हणतात सहसंवेदना (एम्‍पथी). आज आमच्या समाजातील दिव्यांग जनांनाही सहसंवेदनेची भावना व पुढे केलेला मदतीचा हात हवाय.

तसेच, दिव्‍यांगांच्‍या जीवनातील सबलीकरणासाठी त्यांना योग्य शिक्षण-प्रशिक्षण मिळायला हवे. ते व्हायचे असेल तर शिक्षण संस्थांमध्ये जमिनीवरील तसेच अंतरिक्षातील (आयटी-नेट) साधनसुविधा प्रवेश सुलभ होणे अत्यंत गरजेचे. त्यासाठी आवाज आपण उठविला पाहिजे.

दृष्टिबाधीत, कर्णबधिर, सरेब्रेल पाल्सी, ऑटीझम अशा दिव्यांगांच्या मुलांना आयटी, नॅट, मोबाईल ॲप्स, डिजिटल साधने अशा गोष्टी उपलब्ध आहेत; परंतु या गोष्टी अजून सर्वसामान्य कुटुंबांना परवडणाऱ्या नाहीत. त्या तशा होण्यासाठी सरकारे, विविध संस्था, उद्योग-व्यवसाय यांच्यावर सार्वत्रिक समाजाचा दबाव यायला हवा.

दिव्‍यांगांविषयी केवळ कुतूहल नव्हे तर समज, सजगता निर्माण करावी लागेल. ही समाजजागृती मग आपल्यात ‘एम्‍पथी’ निर्माण करते. आणखी एक महत्त्वाचा विचार आज आपण करावयास हवा. तरुण असताना आपणास दिव्यांग विषयाकडे लक्ष द्यावे असे वाटत नसते. म्हातारपणी अशा डिसेबिलिटीज येतील तेव्हा पाहून घेऊ, अशी भावनाही असते. डोक्यास थोडा शीण देऊन बघा.जीवन हे अत्यंत क्षणभंगूर असते. दुसऱ्या क्षणाला काय होईल? हे आपणास माहीत नसते.

तसेच, आपणास आपल्या चुकीने अथवा दुसऱ्यांच्या चुकीने मोठा अपघात झाल्यास आपण कधीही व्हीलचेअरवर येऊ शकतो. येऊ नये! परंतु हा विचार आपण करावयास हवा. आज धडधाकट असलेली व्यक्ती आजार-दुखण्यांमुळेही डोळे, कान गमावू शकते. मग आपणही असे दिव्यांग होऊ शकतो.

त्यामुळे त्यांच्या विषयीची तिऱ्हाईताची भावना बदलून आपण सहसंवेदनेने त्यांच्याकडे पाहिल्यास, मदतीचा हात दिल्यास सर्वच समाज प्रगतीशील, संवेदनशील व उपेक्षितांना समाजाच्या प्रमुख प्रवाहांत सामावून घेणारा बनेल, नाही का? आजच्या दिवशी याच समाजजागृतीची व बदलाची अपेक्षा संयुक्त राष्ट्र संघाने ठेवली आहे!

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT