World Diabetes Day at North District Hospital, Mapusa. Dainik Gomantak
गोवा

Mapusa: धुम्रपान, मद्यपान मधुमेहाचे मूळ, उत्तर गोवा जिल्हा रूग्णालयात मधुमेह तपासणी व मार्गदर्शन

शिबीरात शंभरहून अधिक रूग्णांची तपासणी करण्यात आली.

गोमन्तक डिजिटल टीम

जागतिक मधुमेह दिनानिमित्त (World Diabetes Day) आज (सोमवारी) उत्तर गोवा जिल्हा रूग्णालयात आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले. यावेळी शिबीरासाठी उपस्थित नागरिकांच्या रक्तातील साखर (Random Blood Sugar Level) तपासण्यात आली. शिबीरात शंभरहून अधिक रूग्णांची तपासणी करण्यात आली. तपासणी केल्यानंतर संबधित व्यक्तीला आवश्यक पुढील वैद्यकीय सल्ला देण्यात आला.

World Diabetes Day at Mapusa.

या आरोग्य तपासणी शिबीरात शासकीय कर्मचारी, रूग्णालयातील कर्मचारी, गोवा पोलीस कर्मचारी तसेच सामन्य नागरिकांची तपासणी करण्यात आली.

World Diabetes Day at Mapusa.

यावेळी उत्तर गोवा जिल्हा रूग्णालयाचे वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी स्वप्निल अर्सेकर यांनी उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन केले. 'रक्तात साखरेचे प्रमाण वाढल्याने मधुमेहाची समस्या निर्माण होते. पौष्टिक आहाराचा अभाव आणि अयोग्य जीवनशैली या बाबी मधुमेह आजारासाठी कारणीभूत मानल्या जातात. यासाठी नियमित साखर आणि उच्च रक्तदाब तापसणी, दररोज चालणे, व्यायम, सकस आहार, आणि पुरेसे पाणी व झोप घ्यायला हवी. तसेच, धुम्रपान आणि मद्यपान अशा व्यसनापासून स्वत:ला दूर ठेवायला हवं,' असे अर्सेकर यांनी यावेळी सांगितले.

World Diabetes Day at Mapusa.

'साखरेचे प्रमाण अधिक असलेल्या पदार्थांचे सेवन, धुम्रपान, मद्यपान हे मधुमेह वाढवण्यासाठी जबाबदार असतात. या वस्तू शरीराची ग्लुकोज पचवण्याची क्षमता कमकुवत करतात. याने मुत्रपिंड आणि मज्जातंतूला नुकसान होण्याचा धोका बळावतो.' अशी माहिती अर्सेकर यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT