World Book Day 2024 Dainik Gomantak
गोवा

World Book Day 2024 : सध्याच्या संगणक युगात लोप पावत चाललीय वाचनसंस्‍कृती; युवापिढी मोबाईलच्‍या विळख्‍यात

World Book Day 2024 : तज्ज्ञांच्या मते, तरीसुद्धा अजून नाळ पूर्णपणे नाही तुटलेली

गोमन्तक डिजिटल टीम

World Book Day 2024 :

पणजी, आज २३ एप्रिल. संपूर्ण जग आंतरराष्ट्रीय पुस्तक दिवस साजरा करत आहे. पुस्तकांबद्दल उतराई असलेल्या अनेक जणांना आजचा दिवस एखाद्या सणांपेक्षा वेगळा नसेल.

या दिवशी जगातील अनेक महान लेखक- विलियम शेक्सपिअर, मिंगेल डे सेर्वान्टेस, इन्का गार्सिलासो ला वेगा यांची जयंती असते. त्यामुळे युनेस्कोने १९९५ मध्ये पॅरिस इथे झालेल्या परिषदेमध्ये ही तारीख जागतिक पुस्तक दिन म्हणून निवडली.

इंटरनेटने प्रभावित असलेल्या आजच्या या काळात अजूनही पुस्तके लेचीपेची बनलेली नाहीत. एखाद्या कलादालनातील चित्रांचा आस्वाद आनंदाने घेत पुढे सरकावे तसे पुस्तक प्रदर्शनात मांडलेली पुस्तकेही निरखत जाणारे अजूनही अनेकजण दिसतात. आवडत्या लेखकाचे पुस्तक अवचित समोर दिसले की उत्सुकतेने ते हातात घेऊन त्यांची पाने ते उलटत राहतात. एखादे नवीन पुस्तक पुस्तक विकत आणले की त्यातील पानांचा गंध छातीत खोलवर घेऊन पुस्तक वाचायला सुरुवात करणारे आजही अनेक जण सापडतील.

तरुण पिढीला पुस्तक वाचण्याचा सोस नाही, मात्र, पन्नाशी ओलांडली आहे त्यांना अजूनही पुस्तक घेऊन वाचणे खूप आवडते.

हातातील मोबाईल हा अनेकदृष्ट्या सोयीस्कर असतो. एक तर त्याचा आकार लहान असतो, शिवाय त्यात आपल्याला हवी त्‍या विषयाची निवड करता येते. त्यामुळे तरुणांची भिस्त अशा माध्यमांवरच अधिक असते. पण असे असले तरी पुस्तकांचे दिवस अजून संपलेले नाहीत. तरुण मंडळी देखील पुस्तके वाचतात.

- दया मित्रगोत्री, कवयित्री

आज पुस्तकांसमोर समाजमाध्यमे आव्हान बनून उभी ठाकली आहेत. अशावेळी समाजमाध्यमांतून देखील आपले विचार मांडणे हे फार आवश्यक बनले आहे. कारण युवापिढीवर समाजमाध्यमांचा प्रभाव अधिक जाणवतो. छापील साहित्यापेक्षा ते आज इलेक्ट्रॉनिक माध्यमांवर अधिक अवलंबून राहतात.

- सुशांत तांडेल, क्युरेटर (मध्यवर्ती ग्रंथालय)

गेली २७ वर्षे मी ग्रंथपाल या नात्याने ग्रंथालयाशी जुळलेली आहे. काही वर्षांपूर्वी ग्रंथालयांमध्ये वाचकांची गर्दी असायची. आज अनेक माध्यमांद्वारे लोक वाचत असल्यामुळे ज्या अधीरतेने पूर्वी लोक वाचनालयात यायचे तसे आज येत नाहीत. मात्र अजूनही लोकांत पुस्तक वाचनाची सवय आहे.

- चेतना कुंकळकर, ग्रंथपाल (गोमंत विद्या निकेतन वाचनालय)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT