Tillari Dam Dainik Gomantak
गोवा

तिलारी धरणातून गोव्यात येणाऱ्या पाण्याचा ठेवला जाणार हिशोब; 1.14 कोटींचे 3 डॉपलर कार्यरत

जमा करण्यात आलेला डेटा पोर्वरीतील विश्लेषण केंद्राकडे छाननीसाठी पाठविला जातो.

Pramod Yadav

Tillari Dam: महाराष्ट्रातील दोडामार्ग येथील तिलारी जलाशयातून गोव्यातील तीन तालुक्यांसाठी पाणी पुरवठा होत असतो. दुरुस्तीच्या कारणास्तव धरणाचे दोन्ही कालवे 15 डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्यात आले आहेत. पाणी पुरवठा सुरु झाल्यावर गोव्याला दिल्या जाणाऱ्या पाण्याचा हिशोब ठेवला जाणार आहे.

यासाठी जागतिक बँकेच्या मदतीने 1.14 कोटी खर्चून 22 स्टेशन्स आणि तीन डॉपलर बसवण्यात आले आहेत.

राष्ट्रीय जलविज्ञान प्रकल्पाचा एक भाग म्हणून 12-व्होल्ट सौर बॅटरीद्वारे चालणारे तीन डॉपलर स्थापित करण्यात आले आहेत. जागतिक बँकेने यासाठी निधी दिला आहे.

मागील काही महिन्यांपासून 22 स्टेशन्स कार्यरत आहेत. जमा करण्यात आलेला डेटा पोर्वरीतील विश्लेषण केंद्राकडे छाननीसाठी पाठविला जातो.

तिलारी उजवा कालवा डिचोली आणि बार्देश तालुक्यातून जातो. तीनपैकी दोन डॉपलर सध्या कार्यरत असून, एक अस्नोडा आणि एक गिरी येथील कालव्याच्या बेडवर बसवला आहे. कालव्यातील पाण्याची पातळी जाणून घेण्यासाठी या सिस्टीमची मदत होणार आहे.

पेडणेमधून जाणार्‍या डाव्या कालव्यावर एक डॉपलर बसविण्यात आला असून, सध्या तो कार्यरत नाही. डॉपलर व्यतिरिक्त, 19 स्टेशन आहेत ज्याच्या मदतीने पाण्याचे विसर्जन, खोली, वेग इत्यादी रेकॉर्ड करण्यास मदत करतात," असे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्याने टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या माहितीत म्हटले आहे.


महाराष्ट्रातून येणार्‍या पाण्याचे प्रमाण याची माहिती दर तासाला गोळा केली जाईल, याचे राज्य WRD अधिकारी तसेच केंद्र सरकारचे अधिकारी विश्लेषण करतील.

दोडामार्ग येथील तिलारी सिंचन प्रकल्प दोन्ही राज्यांतील पाण्याची गरज पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र आणि गोवा सरकारने संयुक्तपणे बांधला होता. गोव्यात, सोडले जाणारे पाणी डिचोली, बार्देश आणि पेडणे तालुक्यांमध्ये सिंचन आणि पिण्याच्या गरजांसाठी वापरले जाते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT