Robotics
Robotics  Dainik Gomantak
गोवा

गोव्यात विज्ञान आणि रोबोट्स विषयांच्या अनोख्या कार्यशाळा

दैनिक गोमन्तक

पणजी: पुणे येथे संडे सायन्स स्कूल व सकाळ माध्यम समूह गेली 12 वर्षे मुलांनी प्रयोगातून विज्ञान-तंत्रज्ञान शिकावे यासाठी सतत प्रयत्न करीत आहे. प्रयोगांचा आनंद आणि विषयांचे आकलन अशा दोन्ही गोष्टी मुलांना सहजपणे देणारे वार्षिक उपक्रम आणि सुट्ट्यांमधील विज्ञान व रोबोटिक्स विषयांच्या कार्यशाळा मुलांना नेहमीच आवडलेल्या आहेत. शन्मुखानंद सभागृह, रावणफोंड-मडगाव येथील ई अकॅडमी यांच्या सहकार्याने उन्हाळ्याच्या (Summer) सुट्टीमध्ये तीन कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले आहे. (workshops on science and robotics in Goa)

समजून घ्या विज्ञानाचा आपल्या जगण्यामध्ये होणारा उपयोग

वॉशिंगमशीनचे कार्य, प्रत्यक्ष चुंबकीय रुळांवरून तरंगत जाणारी ट्रेन, टाकीमधील पाण्याच्या विविध पातळ्या दाखवणारे इलेक्ट्रॉनिक्स चे सर्किट, विजेची निर्मिती करणारा जनरेटर, सुरक्षेसाठी वापरता येणार अलार्म, खोल खोल दिसणारी विहीर असे विविध विज्ञानाचे उपयोग प्रत्यक्ष प्रयोग करून व ही उपकरणे बनवून मुले समजावून घेणार आहेत. सर्व साहित्य मुलांना कायम स्वरूपी मिळणार आहे.

दिनांक 12 ते 15 मे या कालावधीमध्ये 4 दिवसांची 4 रोबोट्स स्वतः बनविण्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. रोबोटिक्स हा विषय सर्वांच्याच आकर्षणाचा आणि कुतूहलाचा असतो. रोबोटिक्स विषय शिकण्याची सुरुवात स्वतःच्या हाताने विविध रोबोट्स बनवून करणे मुलांना नक्कीच आवडेल. कार्यशाळेमध्ये रोबोटचे तंत्र, प्रकार व उपयोजन आदी मूलभूत संकल्पना समजून घेतल्यानंतर प्रत्येक विद्यार्थी स्वतंत्रपणे पाच रोबोट्स बनविणार आहे. मोटारच्या मदतीने चालणारा बगबॉट, चित्र काढणारा ड्रॉबॉट, सूर्याच्या उर्जेवर चालणारा रोबोट - क्रोकबॉट आणि आवाजाचा इलेक्ट्रॉनिक सेन्सर असणारा क्लॅपबॉट असे विविध रोबोट प्रत्येक सहभागी विद्यार्थी तयार करणार आहे. कार्यशाळा पूर्ण केल्यावर सर्वाना प्रमाणपत्र दिले जाईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IFFI Goa Poster Launch: फ्रान्स येथील कान्स चित्रपट महोत्सवात इफ्फीचे पोस्टर लाँच

District and Sessions Court: कोलवा येथील वेश्याव्यवसाय प्रकरणात दोषी ठरलेला विजय सिंगला 3 वर्षांची कैद

Supreme Court: ‘’बस्स! पुरे झाले, तुम्ही निकाल न वाचताच आला आहात...’’; CJI चंद्रचूड यांचे उत्तराधिकारी कोर्टरुममध्ये का संतापले?

Panaji News : सांताक्रुझ मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलणार : आमदार रुडाॅल्फ फर्नांडिस

इंजिनिअरिंग ड्रॉपआऊट विद्यार्थ्याने Chat GPT च्या मदतीने सुरु केली बनावट कॅसिनो वेबसाईट, गोवा पोलिसांनी केली अटक

SCROLL FOR NEXT