Workers are being targeted by SEZA in goa Dainik Gomantak
गोवा

Goa: सेझा व्यवस्थापनाकडून कामगारांना 'टार्गेट' केलं जातंय

कामगारांना पुन्हा अर्धे वेतन देण्यात येत आहे. तर दुसऱ्या बाजूने अनावश्यक कारण पुढे करून कामगार तसेच कामगार संघटनेला वेठीस धरण्यात येते. असा आरोप सेझा कामगार संघटनेचे अध्यक्ष निलेश कारबोटकर यांनी केला.

Dainik Gomantak

डिचोली: न्याय मागण्यांची पूर्तता सोडाच, उलट सेझा (SEZA) (वेदांता) कंपनीच्या स्थानिक व्यवस्थापनाकडून कामगारांना 'टार्गेट'(Target) करून अक्षरशः सतावणूक करण्यात येत आहे. अशी कैफियत या कंपनीच्या डिचोलीतील कामगारांनी शुक्रवारी डिचोलीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत मांडली. एकाबाजूने कामगारांना पुन्हा अर्धे वेतन देण्यात येत आहे. तर दुसऱ्या बाजूने अनावश्यक कारण पुढे करून कामगार तसेच कामगार संघटनेला वेठीस धरण्यात येते. असा आरोप सेझा कामगार संघटनेचे अध्यक्ष निलेश कारबोटकर यांनी केला.

कंपनी व्यवस्थापनाने कामगारांची सतावणूक थांबवली नाही, तर कंपनीची बेकायदा कृत्ये पुढे करून खाण व्यवसाय सुरु करण्यापासून कंपनीला रोखून धरण्यास कामगार मागे राहणार नाहीत. असा इशाराही कामगार संघटनेने दिला. कंपनीच्या सारमानस येथील प्रकल्पातील एका सहकारी कामगाराला क्षुल्लक कारणावरुन कामावर येण्यास मनाई करण्यात आली आहे. असा दावाही त्यांनी केला आहे.

सरकारने वेळीच याप्रकरणी हस्तक्षेप करून कामगारांची सतावणूक थांबवावी. अशी मागणीही त्यांनी केली. यावेळी सेझा कामगार संघटनेचे किशोर लोकरे, नारायण गावकर, राजेश गावकर, इंद्रा फाळकर, बाबुसो कारबोटकर, संजय मांद्रेकर, महेश होबळे, ज्ञानेश्वर आमरे, रत्नाकर शेट्ये, पांडुरंग परब, अनिल सालेलकर, देवू गावकर आणि
लक्ष्मीकांत नाईक उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa E20 Petrol: 'ई-20'चा सर्वाधिक फटका गोव्याला? केजरीवालांचा भाजप सरकारवर निशाणा; 40% गोमंतकीयांकडे चारचाकी

Goa Congress: विधानसभा तिकीटासाठी 4 कोटींची बोली? खर्गेंच्या हॉटेल बिलावरूनही ग्रासियस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप

Pakistan AC Blast: पाकिस्तान हादरलं! रुग्णालयात एसी कॉम्प्रेसरचा भीषण स्फोट, 15 नवजात बालकांचा होरपळून मृत्यू; पालकांचा काळीज पिळवटणारा आक्रोश VIDEO

खरी कुजबुज: धो धो आश्वासने!

Goa Crime: 'त्या' नराधम बापाला कोर्टाचा मोठा दणका! अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी ठोठावली 20 वर्षांची शिक्षा; 1.30 लाखांचा दंड

SCROLL FOR NEXT