Worker Death in Ponda Dainik Gomantak
गोवा

फोंड्यात खोदलेल्या चेंबरमधील पाण्यात बुडून कामगाराचा मृत्यू

एका कामगाराने वाचवला आपला जीव; कपिलेश्‍वरी-ढवळी येथील घटना

दैनिक गोमन्तक

फोंडा : कपिलेश्‍वरी-ढवळी येथे मलनि:स्सारण एसटीपी प्रकल्पाचे काम सुरू असताना खोदलेल्या चेंबरमधील पाण्यात बुडून एका कामगाराचा मृत्यू झाला आहे. शुभम गोपडे असं या 21 वर्षीय कामगाराचं नाव असून हा दुर्दैवी प्रकार काल गुरुवारी संध्याकाळी घडला आहे. याप्रकरणी फोंडा पोलिसांत अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दाग परिसरातील कपिलेश्‍वरी-ढवळी येथील मलनि:स्सारण प्रकल्पाचे काम सुरू आहे. या ठिकाणी मलनि:स्सारण प्रकल्‍पाच्‍या वाहिन्या आणि विहिरी बांधण्यासाठी खोदकाम करण्‍यात येत आहे. शुभम विहिरीतील पाण्यात अडकल्यानंतर त्याला इतरांनी मोठे परिश्रम करून बाहेर काढले आणि फोंड्यातील आयडी उपजिल्हा इस्पितळात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र तेथील डॉक्‍टरांनी त्‍याला मृत घोषित केले. फोंडा पोलिस पुढील तपास करत आहेत.

कपिलेश्‍वरी-ढवळी येथील तिठ्यावर असलेल्या एसटीपीच्या संप विहिरीत दोन कामगार उतरले होते. मात्र अचानकपणे या विहिरीत पाणी भरू लागले. त्यामुळे एका कामगाराने कसेबसे विहिरीबाहेर येऊन आपला जीव वाचवला. पण दुसरा कामगार शुभम गोपडे हा या पाण्यात बुडाला. अचानकपणे पाणी भरल्याने शुभमला या विहिरीच्या बाहेर पडणे कठीण बनले. त्यामुळे त्याचा बुडून मृत्‍यू झाला. शुभम हा परप्रांतीय असून तो सध्या फोंड्यात राहत होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मनोज परबांच्या कार्यकर्त्यावर मंत्री नीलकंठ हळर्णकर धावून गेले; कोलवाळमध्ये आरजी आणि भाजप समर्थक आमने-सामने Watch Video

Harus Rauf Controversy: रौफला '6-0' आणि 'प्लेन क्रॅश'ची नक्कल भोवली! फायनलआधी 'ICC'नं केली कारवाई, भारताशी पंगा घेणं पडलं भारी

नवरात्र, वाघ, हिंदू आणि अभयारण्य! गोव्यात व्हिडिओवरुन वाद; सामाजिक कार्यकर्त्याला धमकी देणाऱ्या भाजप नेत्यावर अखेर गुन्हा

सा जुझे दी आरियाल पुन्हा चर्चेत; पंचायत समोरील संत जोसेफ यांच्या पुतळ्याची विटंबना करुन चोरी

'पाठीत खंजीर खुपसला पण काँग्रेससोबत एकत्र लढण्यास तयार'; आप नेते पालेकरांचे काँग्रेस नेत्यांना चर्चेचे आवाहन

SCROLL FOR NEXT