Birla Verna Junction To Dabolim Flyover Dainik Gomantak
गोवा

Verna Junction: वेर्णा-दाबोळी उड्डाण पुलाच्या कामाला वेगाने सुरुवात; अर्धाअधिक रस्ता अडवल्याने वाहतुकीवर परिणाम

Birla Verna Junction To Dabolim Flyover: बिर्ला-वेर्णा जंक्शन ते दाबोळी विमानतळ दरम्यान बांधण्यात येणाऱ्या उड्डाण पुलाचे काम जोरात सुरू आहे.

Sameer Panditrao

Birla Verna Junction To Dabolim Flyover Construction Work

वास्को: बिर्ला-वेर्णा जंक्शन ते दाबोळी विमानतळ दरम्यान बांधण्यात येणाऱ्या उड्डाण पुलाचे काम जोरात सुरू आहे. तथापि, वाहतूक सुरळीत होण्यासाठी संबंधितांना काही उपाययोजना करण्याची गरज आहे.

खोदकाम करण्यासाठी रस्त्यावर पत्रे लावण्यात आल्याने रस्ता अतिशय अरुंद झाला आहे. त्यामुळे दुचाकीचालकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. तेथे काहीजणांना अपघाताला सामोरे जावे लागले आहे. तसेच आसपासच्या रहिवाशांना धुळीचा त्रास सहन करावा लागतो.

बिर्ला-वेर्णा जंक्शन ते दाबोळी विमानतळपर्यंत उड्डाणपूल उभारण्यास केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी निधीही मंजूर केला आहे. या पुलाचा वापर मुरगाव बंदरात ये-जा करणारी अवजड वाहने तसेच इतर अवजड वाहनांसाठी करण्यात येणार आहे. या उड्डाण पुलाखालील रस्त्याचा वापर इतर वाहनांसाठी होणार आहे. त्यामुळे तेथील वाहतूक व्यवस्था सुधारण्यास हातभार लागणार आहे. काही ठिकाणी रस्ता ओलांडताना लोकांना त्रास सहन करावा लागतो. तो दूर होण्यास मदत होणार आहे. येथील एमईएस चौक ते वालिस जंक्शन दरम्यान पुलाचा खांब उभारण्याचे काम जोरात सुरु आहे.

बोगमाळो-दाबोळी चौकात पुलाचे खांब उभारण्यासाठी खोदकाम सुरु करण्यात आले आहे. त्यासाठी अर्धाअधिक रस्ता वाहतुकीला बंद झाला आहे. त्यामुळे तेथील ट्रॉफिक सिग्नलचा हिरवा दिवा बंद होण्यापूर्वीच आपले वाहन पुढे नेण्यासाठी प्रत्येकजण वाहन वेगाने हाकू लागला आहे.काहीजणांनी ट्रॉफिक सिग्नल जम्प करण्यास तसेच चुकीच्या दिशेने वाहने हाकण्यास आरंभ केला आहे. या चौकात वाहतुकीसंबंधी बेशिस्त येऊ लागल्याने तेथे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

IND Vs ENG: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाने रचला इतिहास, परदेशी भूमीवर केली दमदार कामगिरी; कांगारुंचा मोडला रेकॉर्ड

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

SCROLL FOR NEXT