Wast Dainik Gomantak
गोवा

सांताक्रुझमध्ये कचरा शेडचे काम पोलिस बंदोबस्तात सुरू

उच्च न्यायालयाच्या दणक्याने पंचायत आली ताळ्यावर

दैनिक गोमन्तक

पणजी: सांताक्रुझ पंचायत क्षेत्रातील कचऱ्याचा प्रश्‍न यावेळी तेथे झालेल्‍या पंचायत निवडणुकीत चांगलाच गाजला. निवडणूक पार पडताच आणि आचारसंहिता हटताच पंचायत प्रशासन खडबडून जागे झाले आणि त्यांनी प्रस्तावित कचरा शेड उभारणीचा निर्णय घेतला. काल शुक्रवारी सकाळी पंचायत सचिव महेश नाईक यांनी पोलिस बंदोबस्तात शेड उभारणीच्या कामाला प्रारंभ केला.

(Work on garbage shed in Santacruz continues under police protection)

बांबोळी ते दोनापावला रस्त्याच्या बाजूला वेर्णेकर हॉटेलपासून जवळच असलेल्या आणि सांताक्रुझ पंचायतीच्या मालकीच्या जागेत कचरा वर्गीकरण शेड उभारण्याच्या कामाची निविदा 19 जुलैला काढण्यात आली होती. परंतु आचारसंहितमुळे हे काम सुरू झाले नाही. आचारसंहिता हटताच पंचायतीने शेड उभारणीचे काम हाती घेतले आहे.

सांताक्रुझ पंचायतीच्या कचऱ्याचा प्रश्‍न उच्च न्यायालयात पोहोचला आहे. पंचायत क्षेत्रात अस्ताव्यस्त पडलेल्या कचऱ्यावरून उच्च न्यायालयाने पंचायतीला धारेवर धरले होते. त्‍यानंतर कचरा वर्गीकरण करणारे तथा साहित्य पुनर्प्राप्ती सुविधा (एमआरएफ) शेड उभारण्याचे आश्‍वासन उच्च न्यायालयात दिले होते. तसेच एमआरएफ शेड उभारण्याचे काम हाती घेतले नाहीतर पंचायत सचिवांवर कायदेशीर कारवाई करण्याची तंबी दिली होती. त्यामुळे पंचायत सचिवांना पुढाकारा घेऊन हे काम करावे लागले.

पंचायत निवडणुकीची आचारसंहिता निकालानंतर 12 रोजी सायंकाळी उठल्यानंतर तात्काळ दुसऱ्याच दिवशी म्हणजे शुक्रवारी सकाळीच पोलिसांना पाचारण करून जेसीबीच्या साहाय्‍याने कचरा वर्गीकरण शेड उभारणीचे काम सुरू करण्‍यात आले. यापूर्वी शेडला स्‍थानिकांनी विरोध केला होता. त्यामुळे पोलिसांचे संरक्षण घेण्‍यात आले.

- महेश नाईक, पंचायत सचिव

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: कुंकळ्ळीतील 100 घरांवर पडणार हातोडा! हायकोर्टाचा आदेश

Raechelle Banno: 'IFFI ला माझ्या चित्रपटाने सुरुवात झाली हे पाहून आनंद झाला'; बेटर मॅनच्या अभिनेत्रीने भूमिकेच्या दबावाबद्द्ल मांडले मत

Saint Francis Xavier Exposition: वाजत गाजत निघाली गोंयचो सायबाची मिरवणूक; पहिल्या सोहळ्याचे खास Video पाहा

Goa Government: गोवा सरकारचा मोठा निर्णय; अपघातग्रस्तांना 10 लाखापर्यंत मिळणार नुकसान भरपाई

Sunburn Festival: हा सूर्य हा जाळ

SCROLL FOR NEXT