Happy Women's Day 2025 Dainik Gomantak
गोवा

Women's Day 2025: 'ती' ला 'ती' ची साथ; ऑफिस पॉलिटिक्स, करिअर ग्रोथ आणि आत्मविश्वास!

Women Empowerment: फारशी सवय नसल्याने परिणामी ती नेहमीच शांत असायची, आणि तिची क्षमता असूनही, ती मागे पडायची....

Akshata Chhatre

International Women's day 2025: एका मोठ्या कॉर्पोरेट ऑफिसमध्ये, 'राधिका' नावाची एक हुशार, मेहनती मुलगी आहे. तिची काम करण्याची पद्धत, तिची कल्पनाशक्ती खूप चांगली आहे. पण, ती नवीन असल्यामुळे, तिला ऑफिसमधल्या पॉलिटिक्सची, ऑफिसच्या वातावरणाची किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांशी कसं बोलायचं, याची फारशी सवय नसल्याने परिणामी ती नेहमीच शांत असायची, आणि तिची क्षमता असूनही, ती मागे पडायची....

काही दिवस निघून जातात आणि 'अंजली' नावाची एक अनुभवी महिला अधिकारी तिला थांबवते आणि कॉफीसाठी विचारते. या कॉफीच्यावेळी अंजली राधिकाला तिची गोष्ट सांगते, तिचा संघर्ष कसा होता, ती आता एवढ्या मोठ्या पदावर काशी-काय आहे, तिने कसं यश मिळवलं आणि बरंच काही. अंजली राधिकाला मार्गदर्शन करते, तिला आत्मविश्वास देते, आणि तिला तिच्या कामात मदत करते. काही महिन्यांतच, राधिकाचा आत्मविश्वास वाढतो, ती अधिक जोमाने काम करायला सुरुवात करते, आणि तिला तिच्या कामासाठी ओळख मिळते.

आपण नेहमी हेच ऐकत आलोय की महिलाच नेहमी महिलांना मागे खेचत असतात. पण एखाद्या महिलेनेच एका महिलेला मदत केली तर? महिलादिनच्या निमित्ताने आज आपण ऑफिसमध्ये महिलांना येणाऱ्या समस्या आणि त्यावर महिलाच जर का मार्गदर्शक बनून एकमेकींची मदत करू लागल्या तर काय? याबद्दल विचार करून पाहूया..

महिलांनी महिलांना मार्गदर्शन का करावं ?

महिलांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं. एकमेकींना मार्गदर्शन केल्याने, अनुभवांची देवाणघेवाण होते, आणि एकमेकींना योग्य उपाय शोधायला मदत मिळते. ऑफिसच्या तसंच घरच्या टेन्शनमुळे अनेकदा, महिलांना त्यांच्या क्षमतेवर शंका येते. योग्य मार्गदर्शनाने, त्यांचा आत्मविश्वास वाढतो, आणि त्या अधिक सक्षम होतात.

"स्त्री ही केवळ जीवनदात्री नसून, ती संस्कारांची जननी आहे. तिच्या कर्तृत्वाला सलाम! जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

अनुभवी महिला त्यांचे अनुभव सांगून नवीन महिलांना खचकाळग्यांसाठी तयार करू शकतात. महिलांनी एकमेकींना प्रोत्साहन दिल्याने सकारात्मक वातावरण तयार होतं आणि एक छान मैत्रीचं नातं तयार व्हायला सुद्धा मदत मिळते.

जेव्हा महिला महिलांना मार्गदर्शन करतात, तेव्हा..

मार्गदर्शन करणाऱ्या महिलेला, तिने मिळवलेल्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा उपयोग दुसऱ्या महिलेला मदत करण्यासाठी करता येतो. यामुळे तिला समोरच्या व्यक्तीला मदत केल्याचं समाधान मिळतं आणि तिच्या स्वतःच्या नेतृत्व क्षमतेत वाढ होते. दुसऱ्या बाजूला मार्गदर्शन घेणाऱ्या महिलेला, नवीन स्किल्स शिकायला मिळतात, आत्मविश्वास वाढतो, आणि तिला तिच्या कामात यश मिळतं. यामुळे एक सशक्त महिला समाज तयार होतो.

अधिकाधिक महिला जेव्हा नेतृत्व करायला समोर येतात तेव्हा आपोआप कंपनीच्या निर्णयांमध्ये समोर येणाऱ्या वेगवेगळ्या दृष्टिकोणांमुळे समतोल निर्मण होते. महिलांचे नेतृत्व कंपन्यांना समावेशक बनवते. अनेकदा, महिलांना योग्य मार्गदर्शन न मिळाल्याने, त्यांना प्रमोशन मिळवणं सुद्धा कठीण जाऊ शकतं. एखाद्या अनुभवी महिलेच्या मार्गदर्शनामुळे, त्यांना त्यांच्या कामात सुधारणा करता येते, आणि वरिष्ठ पदांसाठी स्वतःला तयार करता येतं. योग्य मार्गदर्शनामुळे योग्य वेळी योग्य संधी मिळवता येतात.

तुम्ही इतर महिलांना मार्गदर्शन कसे करू शकता?

तुमच्या ऑफिसमध्ये एखादी नवीन महिला किंवा मुलगी जॉईन झाली असेल तर

  • अनुभव सांगा: तुमच्या कामाच्या अनुभवांबद्दल, तुमच्या अडचणींबद्दल, आणि तुम्ही त्या अडचणी कशा सोडवल्या, याबद्दल सांगा.

  • सल्ला द्या: तिला कामात मदत करा, तिला पुढे जाण्यासाठी आवश्यक असणाऱ्या स्किल्स शिकवा आणि योग्य मार्गदर्शन करा.

"जग सुंदर आहे कारण त्यात तुझ्यासारख्या शक्तिशाली महिला आहेत. तुझ्या आत्मविश्वासाला आणि धैर्याला सलाम! महिला दिनाच्या शुभेच्छा! "
  • प्रोत्साहन द्या: तिला तिच्या कामात प्रोत्साहन द्या, तिच्या चांगल्या कामाची प्रशंसा करा, आणि आत्मविश्वास द्या.

  • संपर्क वाढवा: तिला तुमच्या संपर्कातील लोकांशी जोडा, आणि तिला नवीन संधी मिळवून द्या. काही त्रास असल्यास तो ऐका आणि समजून घ्या आणि अडचणी सोडवण्यात मदत करा.

कारण, "ती" ची साथ, "ती" चा हात, हेच महिला सक्षमीकरणाचे खरं रहस्य आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa News Live: ओपा जल शुद्धीकरण प्रकल्पाजवळ ट्रक दरीत कोसळला

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

Goa Rain Update: गोव्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी! पावसाचा रौद्रावतार; आपत्कालीन यंत्रणा सतर्क

SCROLL FOR NEXT