Deepali Parwar Dainik Gomantak
गोवा

Women’s Day 2023 : गरिबीतही संसाराचा गाडा ओढणारी दीपाली परवार

बांबूपासून वस्‍तू बनवून उदरनिर्वाह

दैनिक गोमन्तक डिजिटल

(सपना सामंत)

महिला...महिला म्हणून तिचे समाजात स्थान कुठे आहे, हे शोधणे तितके सोपे नाही. आज प्रत्येक महिला आपापल्या क्षेत्रात नाव मिळवून उंच भरारी घेत आहे. समाजात वावरताना काही सर्वांच्या प्रकाशझोतात येतात तर काही पडद्यामागे राहून काम करत असतात.

महिलांना आयुष्यात खूप काही करायचे असते, मात्र त्यांना योग्य मार्गदर्शन व प्रोत्साहनाची गरज आहे. दारिद्र्य व आधार नसल्याने आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या कित्येक महिला कुटुंबाचा आधार बनून आपला उदरनिर्वाह करत असतात. अशीच एक महिला म्हणजे देऊळवाडा-पिसुर्ले येथील दीपाली दामोदर परवार होय.

लहानपणापासून गरिबीतून वर आलेली आणि लग्न झाल्यानंतरही गरिबीतच दिवस काढावे लागणाऱ्या दीपाली यांचा मुख्य व्यवसाय बाबूंपासून हस्तकला तयार करण्‍याचा. ही कला तिने आपल्या बालपणीच आत्मसात केली. त्यानंतर लग्न झाल्यानंतर हळूहळू ती त्यात रमून गेली.

घरची परिस्थिती हलाखीची, त्यात पती काही वर्षांपासून आजारी. त्‍यामुळे घरची सर्व जबाबदारी तिच्यावर पडली. पदरी तीन मुले. कसाबसा संसाराचा गाडा ती ओढत आहे.

काही वर्षांपूर्वी बांबोळी येथे गोवा मेडिकल कॉलेजमध्‍ये स्वच्छता कामगार म्हणून ती कामाला होती. मात्र पती आजारी पडल्याने तिला नोकरी सोडावी लागली. त्यामुळे कुटुंबावर मोठे संकट आले.

सध्‍या दीपाली बाबूंपासून अनेक कलाकृती तयार करत आहे. त्यात पाटले, सुपे, दाळी, लग्न कार्यासाठी लागणाऱ्या वस्तू, फुलदाणी व इतर शोभेच्या वस्तूंचा समावेश आहे. तिला खूप काही करायचे आहे.

मात्र आर्थिकदृष्ट्या पाठबळ नसल्याने ती खचून गेली आहे. बातचीत केली असता ती म्हणाली, आजपर्यंत कोणाकडून कुठलीच मदत मिळालेली नाही. मदतीची खूप गरज आहे.

मुलांच्‍या शिक्षणासाठी काबाडकष्‍ट

आपल्या कष्‍टाच्‍या जोरावर दीपाली मुलांना चांगले शिक्षण देत आहे. नुकतीच तिची मुलगी परिचारिका बनली आहे. त्यामुळे आता काही प्रमाणात आर्थिक आधार मिळत असल्याची ती सांगते.

भुईपाल गावचे सूर्यकांत गावकर हे वेळोवेळी मदत करतात. त्याचबरोबर बांबूचे साहित्य व माडाच्या झावळांचे (चुडतांचे विण) वेगवेगळ्या कलाकृती करण्यासाठी तिला सांगतात. आता घरी काही प्रमाणात ऑर्डर येतात.

मात्र त्‍या पुरेशा नाहीत. सरकारच्या अनेक योजना आहेत म्‍हणे, मात्र अजूनही त्‍या आपल्‍याला अवगत नाहीत, असे ती म्‍हणते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT