Anjuna Illegal Construction | CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

CM Pramod Sawant: मुख्यमंत्री सावंत दक्षिण मोहिमेवर!

दैनिक गोमन्तक

CM Pramod Sawant: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी चार दिवसांच्या दिल्ली दौऱ्यानंतर दक्षिण भारताचा राजकीय दौरा सुरू केला आहे. दिल्ली दौऱ्यावरून परतलेले मुख्यमंत्री दीड दिवसच गोव्यात होते, ते आता तेलंगण-केरळमार्गे पुडुचेरीमध्ये पोचले आहेत.

मुख्यमंत्र्यांकडे भाजपने दक्षिण भारतातील लोकसभा निवडणुकीची जबाबदारी दिली आहे. त्यामुळे ते काल सोमवारी तेलंगणामधील भाजपच्या दोन विजय संकल्प यात्रेत सहभागी झाले. त्यानंतर ते आज केरळमध्ये पोचले आहेत.

त्यांनी इडुकी मतदारसंघातील भाजपच्या गाभा समितीची बैठक घेत लोकसभा तयारीचा आढावा घेतला. तेथे कोणते मुद्दे प्रचारात असतील हेही त्यांनी जाणून घेतले. प्रतिस्पर्धी राजकीय पक्षांच्या तयारीचा अंदाजही त्यांनी घेतला आहे.

मुख्यमंत्री कोट्टायम येथेही गेले, तेथे ते प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेतली. केरळमधील लोकसभा मतदारसंघात भाजपला विजयी करण्यासाठी कोणते मुद्दे प्रभावी ठरू शकतील याचा अंदाज घेणे आणि संघटनात्मक पातळीवर तयारीचा आढावा घेणे, असा या बैठकीचा उद्देश होता.

भाजपने केंद्रीय पातळीवर विविध कार्यक्रमांची अंमलबजावणी, प्रदेश, जिल्हा, मतदारसंघ आणि मंडळ पातळीवर करण्याचे नियोजन केले आहे. त्याची अंमलबजावणी केली की नाही, त्याशिवाय मतदान केंद्र पातळीवर विविध मार्चांच्या समित्या स्थापन झाल्या की नाही, याचाही आढावा घेण्यात आला.

पुढील १०० दिवस भाजपसाठी महत्त्वाचे असल्याचा संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्यानंतर देशभरात भाजपचे महत्त्वाचे नेते दौरे करू लागले आहेत. मुख्यमंत्र्यांकडे दक्षिण भारताची जबाबदारी सोपवल्याने ते सध्या त्या दौऱ्यावर आहेत.

मुख्यमंत्री अलपुझ्झा मतदारसंघात विविध योजनांच्या लाभार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. केंद्र सरकारच्या योजना राबवण्यात केरळचे सरकार सापत्नभावाची वागणूक देते का? हे जाणून घेण्याचा त्यांचा प्रयत्न होता. तेलंगण, केरळच्या दौऱ्यानंतर पुडुचेरीच्या दौऱ्यावर मुख्यमंत्री गेले.

तेलंगणात 10 जागा जिंकणार

तेलंगणात भाजपला लोकसभा निवडणुकीत १० जागा मिळतील असा विश्वास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला. काल त्यांनी विजय संकल्प यात्रेला सुरुवात करून दिली आहे. ही यात्रा यात्रा राज्यातील सर्व १७ लोकसभा मतदारसंघातून फिरून ३३ जिल्ह्यांमधील एक कोटी लोकांपर्यंत पोहोचेल. या यात्रेच्या उद्‍घाटन सोहळ्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सांगितले, की आम्ही तेलंगणात १० पेक्षा जास्त (लोकसभेच्या) जागा जिंकण्यासाठी तयार आहोत, मी तुम्हाला याची खात्री देतो. तेलंगणातील जनतेने ‘मोदी गॅरंटी’वर विश्वास दाखवला आहे. आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी पाठिंबा मागत आहोत. तेलंगणामध्ये, भाजप जिंकण्यासाठी लढत आहे, त्यात असदुद्दीन ओवेसी यांच्या हैदराबादच्या जागेचा समावेश आहे. तेलंगणात दोन अंकी जागा मिळतील, अशी आमची अपेक्षा आहे. त्यासाठी तेलंगणातील भाजपने आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी राज्यातील पाच प्रदेशांचा समावेश करून ‘विजय संकल्प यात्रा’ सुरू केली आहे. २० फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या या यात्रेचा समारोप १ मार्चला होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT