Sexual Assault Cases Dainik Gomantak
गोवा

Calangute Crime News : कळंगुट येथे क्लबमध्ये काम करणाऱ्या विवाहित महिलेवर सामूहिक अत्याचार

प्रसारमाध्‍यमांसमोर कैफियत : संशयितांविरोधात पोलिसांत तक्रार

दैनिक गोमन्तक डिजिटल

कळंगुटमधील एका क्लबमध्ये काम करणाऱ्या विवाहित महिलेवर (मूळ रा. उत्तर प्रदेश) सामूहिक अत्याचार करण्‍यात आल्‍याची तक्रार हणजूण पोलिसांत दाखल करण्‍यात आली आहे. अत्याचार करणाऱ्या व्यक्तीने तसेच अन्‍य तिघांनी आपल्यावर बळजबरी केल्याचा तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याची माहिती पीडित महिलेने पत्रकारांना दिली.

येथील आझाद मैदानावर झालेल्या या पत्रकार परिषदेला सामाजिक कार्यकर्त्या तारा केरकर यांची उपस्थिती होती. त्‍यांच्याकडे पीडितेने धाव घेतल्यामुळे त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.

उत्तर प्रदेशमधून कामासाठी आपणास गोव्‍यात आणले होते. कळंगुटमधील एका क्लबमध्ये आपण वेटरचे काम करते. आपल्‍याला कामाला घेऊन येणाऱ्या व्यक्तीने (मूळ हरयाणा) दि. ६ जून रोजी आपल्यावर बळजबरी केली. त्यानंतर आपणास जीवे मारण्याची धमकी दिली.

आपल्यावर जसा अन्याय झाला, तसाच इतर मुलींवरही झाला आहे, असे पीडित महिलेने सांगितले. परराज्यांतील मुलींवर अत्याचार करून त्यांना धमकावून पिटाळून लावले जाते. केवळ कामाला आणणाराच नाही तर या प्रकरणात इतर तिघेजण असून, ते आम्हाला धमकावत असल्याचे ती म्हणाली.

प्रसारमाध्यमांपुढे येण्याचे कारण म्हणजे आपल्याप्रमाणे इतर मुलींवरही अशीच वेळ येऊ शकते. ती येऊ नये म्हणून आपण ही कैफियत मांडण्‍यासाठी येथे आल्‍याची पीडित महिला म्‍हणाली.

7 मुलींच्या मृतदेहाची अजूनही नाही ओळख

परराज्यांतील मुलींच्या गरिबीचा फायदा घेऊन गोव्‍यात‍ आणून त्यांच्यावर अत्याचार करण्यात येतात. यापूर्वीही असे प्रकार घडलेले आहेत. माहिती अधिकाराखाली मिळालेल्या माहितीनुसार राज्यात ७ मुलींच्या मृतदेहाची ओळख अजून पटलेली नाही. या मुलींना मारल्यानंतर त्यांचे चेहरे विद्रुप करून मृतदेह फेकून देण्‍यात आले.

कळंगुट पोलिसांत पीडित महिला गेली, पण तिला हणजूण पोलिसांकडे जाण्यास सांगण्‍यात आले. पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली असून पोलिस निरीक्षक प्रशांत देसाई यांनी तात्‍काळ पावले उचलली असल्याचे तारा केरकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Panaji: मांडवी पुलावर पेटत्या कारचा थरार! आगीच्या भडक्यात दर्शनी भाग जळून खाक; शॉर्टसर्किट झाल्याचा संशय

Goa Recruitment: तरुणांसाठी खुशखबर! निवड आयोगामार्फत 285 रिक्त जागांसाठी जाहिरात; 'या' पदांसाठी मागवले अर्ज

Vedanta Mining Dispute: पिळगावात दुसऱ्या दिवशीही खनिज वाहतूक बंद; शेतकरी मागणीवर ठाम

IFFI 2024: 'भूमी'चे गोमंतकीयांबद्दल गौरवोद्गार! म्हणाली की, लैंगिक भेदाकडे पाहण्याची दृष्टी...

Goa Crime: पुत्रविरहामुळे व्यथित होऊन 'त्याने' संपवले जीवन! सुसाईड नोटमध्ये केला पत्नी आणि तिच्या प्रियकरावर आरोप; Video मध्ये म्हणाला की...

SCROLL FOR NEXT