Santa Cruz Panchayat Dainik Gomantak
गोवा

'ही गुन्हेगारांची सभा', महिलेच्या वक्तव्यावरुन सांताक्रुझ ग्रामसभेत गदारोळ; माफीसाठी ग्रामस्थ आक्रमक

Santa Cruz Gram Sabha: सरपंचांनी सभेसमोर असलेल्या काही ग्रामस्थ्यांच्या अर्जांवरील चर्चा न घेता ही ग्रामसभा अर्ध्यावरच आटोपती घेतली

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: सांताक्रुझ ग्रामसभेत विविध विषयांवर चर्चा सुरू असताना ग्रामस्थांमधील दोन गटांकडून होणाऱ्या आरोप- प्रत्यारोप तसेच विषय मांडताना पंचायत सदस्यांच्या पाठिराख्यांकडून होणाऱ्या विरोधामुळे एका महिलेने ही सभा गुन्हेगारांची, असा शब्द उच्चारल्याने गदारोळ माजला. तिने याप्रकरणी माफी मागावी, अशी मागणी करून ग्रामस्थांनी ग्रामसभा रोखून धरली. गोंधळामुळे हे प्रकरण हातघाईवर येण्यापूर्वीच सरपंचांनी सभेसमोर असलेल्या काही ग्रामस्थ्यांच्या अर्जांवरील चर्चा न घेता ही ग्रामसभा अर्ध्यावरच आटोपती घेतली.

ग्रामसभेत पोलिस तैनात केले होते. आजच्या सभेत पंचायत घराचा विषय चर्चेला ठेवला होता. पंचायतीने संपादित केलेली जागा ही खाजन असल्याने त्यासंदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल आहे. ‘सीझेडएमपी’त ही जमीन खाजन असल्याचा दावा करून खाजन सोसायटी ऑफ गोवाने सांताक्रुझ पंचायत घराला हरकत घेतली. दुरुस्तीसाठी ‘सीझेडएमए’कडे अर्ज केल्याची माहिती सरंपच जेनिफर ऑलिव्हेरा यांनी ग्रामसभेत दिली. अखेर यासंबंधी ठराव बहुमताने संमत करण्यात आला. रोमीलाही राजभाषेचा दर्जा द्यावा, ठरावही संमत झाला.

घरपट्टी हस्तांतरण शुल्क २५ हजार

राज्यातील बहुतेक पंचायतींमध्ये घरपट्टी हस्तांतरण शुल्क ५ हजार रुपये आहे, मात्र सांताक्रुझ पंचायतीने हे शुल्क पाचपटीने वाढविले. त्यामुळे अनेक ग्रामस्थांनी त्याला हरकत घेऊन अर्ज केले होते. हे अर्ज ग्रामसभेत चर्चेसाठी येणार होते त्यामुळे मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित राहिले. मात्र त्यापूर्वीच सभा बरखास्त करण्यात आली. पंचायतीने हे शुल्क वाढवले, मात्र त्याचा फटका सांताक्रुझ पंचायतीतील फ्लॅटधारकांना बसला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT