Goa Crime News Dainik Gomantak
गोवा

Sattari Crime: मास्क घालून घुसले घरात, महिलेवर केला चाकूहल्ला; दिवसाढवळ्या चोरीच्या घटनेने सालेलीत खळबळ

Sattari Saleli Theft: सालेली येथे घरात घुसून एका महिलेवर चाकूचा वार करून कपाटातील मंगळसूत्रासह महागड्या वस्तू लंपास केल्याची घटना रविवारी भरदिवसा घडली. अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Sameer Panditrao

पिसुर्ले: सालेली येथे घरात घुसून एका महिलेवर चाकूचा वार करून कपाटातील मंगळसूत्रासह महागड्या वस्तू लंपास केल्याची घटना रविवारी भरदिवसा घडली. चोरांनी सुमारे अडीच लाखांचा ऐवज लंपास केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या घटनेनंतर या परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

सालेली येथे आठ दिवसांपूर्वी गृहप्रवेश करून राहायला आलेल्या साईनाथ पेडणेकर यांच्या घरात घुसून दोन चोरांनी त्यांच्या पत्नी वैशाली पेडणेकर यांच्यावर चाकूने वार केला. नंतर मंगळसूत्र तसेच इतर सोन्याचे दागिने पळविले. ही घटना सकाळी साडेआठच्या सुमारास घडली. हे चोर मास्क घालून समोरच्या दाराने येताना पाहिल्यानंतर वैशाली पेडणेकर यांनी आपल्या दोन मुलांना एका खोलीत बंद करून घराचा दरवाजा बंद करण्याचा प्रयत्न केला;

परंतु चोरांनी वेगाने त्यांच्या घराच्या दिशेने धाव घेऊन दरवाजा उघडला आणि घरात प्रवेश करत त्यांच्या हातावर चाकूने वार केला. त्यांना जखमी करून कपाटात ठेवलेल्या मंगळसूत्रासह बऱ्याच किमती वस्तू घेऊन त्यांनी मागच्या दाराने पळ काढला. ते दोघे कोकणी भाषेत बोलत होते, असे वैशाली पेडणेकर यांनी सांगितले.

या घटनेची माहिती रात्रपाळीवर कामावर गेलेले वैशालीचे पती साईनाथ पेडणेकर यांना मिळताच त्यांनी तातडीने होंडा पोलिस चौकीत सविस्तर घटना सांगितली. त्याप्रमाणे वाळपई पोलिस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू केला. ठसेतज्ज्ञांनी घटनास्थळाची पाहणी केली, तर श्वानपथक घराच्या पाठीमागे जाऊन घुटमळत राहिले. पाऊस खूप पडत असल्याने चोरांचा मागोवा मिळू शकला नाही, असे पेडणेकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Canada Technology Deal: भारत-कॅनडा टेक डील! विद्यार्थ्यांना मिळणार एआय आणि डेटा सायन्सचे धडे, बंगळुरुमध्ये दीपस्पेशियलचे दोन मोठे करार

Goa Regional Development: गोव्याचे भौतिकशास्त्र आणि राज्यशास्त्र! कॅसिनो, खाणउद्योग अन् विकासाच्या राजकारणाचा वेध

प्रयत्ने साखरेचे कण वेचिता... तक्रारी सोडा, आनंदाचे क्षण निवडा; सुखी आयुष्याचा सुंदर मंत्र!

Egypt Tourism: इजिप्तचा गूढ वारसा! पिरॅमिड्सपासून नाईल नदीपर्यंत; इतिहास, संस्कृती अन् आधुनिकतेचा अद्भुत संगम

JNU Global Reputation: जेएनयूच्या पाण्यात काय आहे?

SCROLL FOR NEXT