Accidental death  Dainik Gomantak
गोवा

तांबडीसुर्ल - बोळकर्णे मार्गावर टँकरच्या धडकेत महिला ठार

बोळकर्णे बाजारात साहित्य खरेदी करून घरी जाताना घडला अपघात

दैनिक गोमन्तक

तांबडीसुर्ल: तांबडीसुर्ल - बोळकर्णे मार्गावरील मेस्तवाडा येथे आज सकाळी ११ च्या सुमारास वाहनाची धडक बसून वृद्ध महिला जागीच ठार झाली. लक्ष्मी राम गावकर (वय ७०) असे तिचे नाव असून बोळकर्णे बाजारात साहित्य खरेदी करून घरी जाताना हा अपघात घडला. याप्रकरणी डोंगरवाडा साकोर्डा येथील टँकरचालक सत्यवान गावकर याला कुळे पोलिसांनी केली अटक आहे. (Woman killed in tanker collision on Tambadisurl - Bolkarne road )

लक्ष्मी गावकर या आज सकाळी खरेदीसाठी बोळकर्णे बाजारात गेल्या होत्या. तेथे साहित्य खरेदी करून त्या पाण्याच्या टँकरमधून मेस्तवाडा येथे पोचल्या. तेथे रस्ता ओलंडताना एका वाहनाची जोरदार धडक बसून त्या जागीच ठार झाल्या. या अपघातात वाहनाचे चाक डोक्यावरून गेल्याने डोके फुटून मेंदू अस्ताव्यस्त विखुरला होता, तर एक चाक मांडीवरून गेल्याने मांडीचे हाड मोडले होते. तिच्या मागे चार पुत्र, चार विवाहित कन्या, नातवंडे असा परिवार आहे.

अपघाताची माहिती कुळे पोलिसांना मिळताच निरीक्षक संजय दळवी आपल्या सहकाऱ्यांसह अपघातस्थळी त्वरित दाखल झाले. फोंड्याचे पोलिस उपअधीक्षक सी. एल. पाटील यांनीही तातडीने घटनास्थळी धाव घेऊन अपघाताची माहिती घेतली. मृतदेह बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयात पाठवला आहे. निरीक्षक संजय दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अजय धुरी यांनी पंचनामा केला. लक्ष्मी गावकर यांच्या अपघाती निधनामुळे त्यांच्या बोरयाळी - साकोर्डा गावावर शोककळा पसरली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT