Crime Branch Arrested Women Dainik Gomantak
गोवा

Calangute Crime News : अमली पदार्थ प्रकरणात मुंबईतील महिलेला गोव्यात अटक

50 हजारांचा एमडीएमए ड्रग्ज जप्त

गोमन्तक डिजिटल टीम

गुन्हा अन्वेषण विभागाच्या गुन्हे शाखेने बाणावली-सासष्‍टी येथे काल रात्री उशिरा संशयास्पद फिरणाऱ्या खार-मुंबई येथील मंगला विशाल कुराडकर (40) या महिलेला ड्रग्जप्रकरणी अटक केली.

तिच्याकडून 50 हजारांचा एमडीएमए ड्रग्ज जप्त केला असून तिची रवानगी पोलिस कोठडीत करण्यात आल्याची माहिती पोलिस अधीक्षक निधीन वाल्सन यांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुरुषांबरोबर आता महिलाही ड्रग्जविक्री व्यवसायात झटपट पैसा मिळवण्याच्या आशेने उतरल्‍या आहेत. गेल्या काही दिवसांत राज्यात दोन महिलांना अटक झाली आहे. त्‍यात या मुंबईच्या महिलेचा समावेश आहे.

ही संशयित महिला बाणावली येथील एका हॉटेलच्या बाहेर पर्यटकांशी संवाद साधत असल्याने पोलिसांना संशय आला. तिला ताब्यात घेतल्यावर ती बिथरली. तिची झडती घेतली असता ड्रग्ज सापडला. ती गेल्या काही दिवसांपूर्वीच गोव्यात आली असून बाणावली येथे भाडेपट्टीवर राहत असल्याची माहिती पोलिसांना दिली. याप्रकरणी अधिक तपास उपनिरीक्षक गिरीश पाडलोस्कर करत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Forward Public Outreach Campaign: 'जनसंवादा'साठी विधानसभेपूर्वी मोहीम; ई-मेलद्वारे सहभागी होण्याचे गोवा फॉरवर्ड, काँग्रेसचे आवाहन

Navelim Housing Board Regularisation: नवेवाडेतील 150 घरांच्या नियमितीकरण पत्रांचे वाटप; 'लाभार्थ्यांकडून केवळ 10 हजार रुपये नाममात्र शुल्क आकारले जाईल'

Goa Western Ghats Eco Sensitive Zone: गोवा जैवसंवेदनशील क्षेत्रातून 22 गावे वगळण्याचा प्रस्ताव कमकुवत? केंद्राकडून अतिरिक्त माहितीची मागणी

Tarun Tejpal Acquittal Appeal: तेजपाल प्रकरणात निकाल राखीव उच्च न्यायालयात दोन्ही बाजूंचा युक्तिवाद; क्लीन चिट कायम राहणार का?

Goa Tourist Places Fine: पर्यटनस्थळांची वाट लावाल तर खिशातून जातील लाखो रुपये! गोव्यात बेकायदेशीर बीच पार्टी, फेरीवाले आणि दलालांवर 1 लाखांपर्यंत दंडात्‍मक कारवाईचा कडक इशारा

SCROLL FOR NEXT