bastora flyover news Dainik Gomantak
गोवा

Bastora News: बस्तोडा उड्डाण पुलावर नग्न अवस्थेत आढळली तरुणी; बेशुद्धावस्थेत मानसोपचार केंद्रात केले दाखल

Woman found naked Bastora junction: बास्तोडा जंक्शनजवळील उड्डाणपुलाखाली मंगळवारी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास एक धक्कादायक घटना समोर आली.

Akshata Chhatre

Bastoda Flyover Incident: उत्तर गोव्यातील बास्तोडा जंक्शनजवळील उड्डाणपुलाखाली मंगळवारी (दि.५) पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास एक धक्कादायक घटना समोर आली. सुमारे २७ वर्षांची एक महिला अर्धवट बेशुद्ध अवस्थेत आणि विवस्त्र स्थितीत आढळल्याने परिसरात खळबळ उडाली. या प्रकरणातील नेमक्या परिस्थितीचा शोध घेण्यासाठी पोलीस तपास करत आहेत.

नेमके प्रकरण काय?

ही घटना सकाळी ४:३० ते ५च्या सुमारास घडल्याने काही वाटसरूंनी त्या महिलेला पाहिले. एका फूड डिलिव्हरी बॉयनं तिचे अंग झाकले, तिची दयनीय अवस्था पाहून त्यांनी तात्काळ प्रसंगावधान राखले. एक क्षणही न घालवता त्यांनी पोलीस आणि रुग्णवाहिकेला फोन करून घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस आणि वैद्यकीय पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यांनी त्या महिलेला सुरक्षितपणे ताब्यात घेऊन पुढील वैद्यकीय तपासणीसाठी जवळच्या इस्पितळात दाखल केले.

घटनास्थळी काही काँडमची पाकिटे आणि पाण्याच्या बाटल्या देखील आढळून आल्या आहेत. सध्या त्या महिलेवर इस्पितळात वैद्यकीय उपचार सुरू असून, तिच्यासोबत नेमके काय घडले, ती या ठिकाणी कशी पोहोचली आणि तिच्या या अवस्थेचे कारण काय आहे, याचा शोध पोलीस घेत आहेत.

ती मनोरुग्ण असल्याचा संशय

उत्तर गोव्याचे पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार वैद्यकीय अहवालात स्वतःला हानी पोहोचवण्याच्या प्रवृत्ती आणि मानसिक आजाराची लक्षणे दिसून आली आहेत. तिला अधिक तपासणीसाठी आयपीएचबीकडे पाठवण्यात आले आहे. अद्याप या महिलेसोबत कुठलाही लैंगिक अत्याचार झाल्याची माहिती पोलिसांना मिळालेली नाही.

पोलिसांमध्ये दाखल केली होती तक्रार

या महिलेने काही दिवसांपूर्वी पोलिसांमध्ये एक तक्रार दाखल केली होती. तिने नोंदवलेल्या तक्रारीनुसार, ब्रुनो फर्नांडिस नावाच्या मुलाने तिला उत्तर प्रदेशातून गोव्यात आणले होते. याच इसमाकडून तिला पर्वरीत राहायला घर देण्यात आले आणि तिथेच ब्रुनो फर्नांडिस आणि त्याच्या काही मित्रांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केला होता. मात्र ही महिला वेळोवेळी पोलिसांना वेगवेगळी माहिती पुरवत असल्याने अद्याप प्रकरणाचा खुलासा झालेला नाही आणि हे प्रकरण महिला पोलिसांकडे वर्ग करण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Rain: तयारीला लागा! पावसाचे सावट दूर होणार, पुढील आठवडा कोरडा; तुलसी विवाहाचा मार्ग मोकळा

Venkateswara Temple Stampede: आंध्र प्रदेशातील व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात चेंगराचेंगरी; नऊ भाविकांचा मृत्यू Video

Goa Tourism: गोव्याचं पर्यटन संपलं नाही वाढलं! पर्यटन मंत्र्यांनी थेट आकडेवारीच दिली, सोशल मीडियावरील दावे काढले खोडून

Goa Today's News Live: केळशीचे सरपंच डिक्सन वाझ बाणावलीतून लढवणार विधानसभा निवडणूक

Karvi Flowers: श्री गणेशाने हत्तीचे रूप घेतले, मुरुगन आणि वल्लीचे लग्न झाले; गोव्यात फुलणाऱ्या 'कारवी'चे महत्व

SCROLL FOR NEXT