Goa Fraud Case Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: गोवा केंद्रीय भांडाराची अधिकारी असल्याचे सांगून महिलेने घातला गंडा; लाटले एवढे कोटी

Ichalkaranji: यापूर्वीही महिलेने एका मोठ्या कापड उद्योजकाची अशीच सव्वा कोटींची फसवणूक केली आहे

गोमन्तक डिजिटल टीम

इचलकरंजी/पणजी : केंद्रीय भांडार गोवा सरकारच्या लेटरहेडचा व कार्यालयाचा गैरवापर करून शहरात पुन्हा एका बड्या कापड व्यावसायिकाची फसवणूक झाली आहे. मशिनरीची बनावट पुरवठ्याची मागणी नोंदवून तब्बल २ कोटी ९९ लाख २ हजार २०० रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी तोतया गोवा भांडाराचे प्रभारी अधिकारी व रेकॉर्डवरील गुन्हेगार वैशाली राया मांजरेकर (रा. पणजी) हिच्यासह जयेश बाळकृष्ण नातू, अनघा नातू या दाम्पत्यावर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. फिर्याद लक्ष्मीकांत दगडूलाल मर्दा (६८) यांनी पोलिसांत दिली.

या गुन्ह्यातील मांजरेकर मुख्य संशयित असून, केंद्रीय भांडार मुंबई विभागाच्या लिपिक असल्याचे सांगून तिने केंद्रीय भांडार गोवा विभागाच्या प्रभारी अधिकारीही असल्याचे सांगितले. तसेच बनावट लेटरपॅड दाखवून विश्वास संपादन केला. याआधीही तिने अशीच एकाची फसवणूक केली होती. वाढत्या कापड फसवणुकीच्या मालिकेत चार महिन्यांतील दुसऱ्या घटनेने अन्य व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लक्ष्मीकांत मर्दा यांची अरविंद कॉटसिन कंपनी आहे. इंडस्ट्रियल इसेन्शियल्स- गोवाचे भागीदार जयेश नातू व त्यांची पत्नी अनघा नातू आणि वैशाली राया मांजरेकर यांनी मर्दा यांच्याशी संपर्क साधला. मांजरेकर या गोवा भांडार विभागाच्या प्रभारी अधिकारी असल्याचे त्यांनी सांगितले.

त्यानंतर बनावट लेटरपॅड, व्यावसायिक कार्ड, शिक्का बनवून मशिनरीचे अधिकृत पुरवठादार असल्याची सांगितले. खोटे शासकीय नोंदणी प्रमाणपत्रही दिले. त्यानंतर मर्दा यांना ३ हजार लिटर क्षमतेचे बल्क डायजेस्टरचे ७५ नग आणि त्यासोबत १० लिटरचे १२० बॅग्स फ्रि मायक्रॉब्स मशिनरीची बोगस ऑर्डर दिली. मात्र या मशिनरी जयेश नातू, अनघा नातू यांच्याकडून घेण्यास सांगितले.

वैशाली मांजरेकरविरोधात १६ तक्रारी अर्ज

वैशाली मांजरेकर या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असून, यापूर्वीही शहरात या महिलेने एका मोठ्या कापड उद्योजकाची अशीच सव्वा कोटींची फसवणूक केली आहे. वर्षात या महिलेने दोन बड्या उद्योजकांना गळाला लावत कोट्यवधी रुपये लाटले. या प्रकरणातील अन्य आरोपी पोलिसांना मिळाले, मात्र ही महिला पोलिसांना अद्याप सापडली नाही. आतापर्यंत तिच्याविरोधात राज्याच्या विविध पोलिस ठाण्यांत सुमारे १६ तक्रारी अर्ज आले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Fake Wedding Party: ना सासरचं टेन्शन, ना खर्चाची चिंता! गोव्यात 'फेक वेडिंग' इव्हेंटनं तरूणांना दिला लग्नसोहळ्याचा अनुभव

Uttarakhand Cloudburst: उत्तरकाशीत निसर्ग कोपला, ढगफुटीमुळे घरं गेली वाहून; कित्येकजण बेपत्ता

कॅसिनोंमध्ये बेकायदा लाइव्ह गेमिंग सुरूच; पोस्टाच्या स्कॅमनंतर सरदेसाईंचे आणखी एक स्टिंग ऑपरेशन, शेअर केला VIDEO

Team India: टीम इंडियावर संकटाचे ढग! रोहित-विराट एकदिवसीय विश्वचषक खेळणार नाही? समोर आली मोठी अपडेट

Sub-Junior Aquatics Championships: गोव्याच्या पूर्वी नाईकचा राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत दमदार परफॉर्मन्स; 2 सुवर्ण, 1 रौप्य जिंकलं

SCROLL FOR NEXT