Goa Fraud Case Dainik Gomantak
गोवा

Goa Fraud Case: एक सही, मोठं आमिष अन् 1.25 कोटींचा गंडा! सव्वा दोन वर्षांनंतर 'लेडी डॉन' गजाआड; कोर्टानं सुनावली 7 दिवसांची कोठडी

Tender Fraud Case: केंद्रीय अधिकारी असल्याचे भासवून यड्राव (कोल्‍हापूर) येथील उद्योजकाची तब्बल १ कोटी २५ लाख ७७ हजार ३४७ रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी: केंद्रीय अधिकारी असल्याचे भासवून यड्राव (कोल्‍हापूर) येथील उद्योजकाची तब्बल १ कोटी २५ लाख ७७ हजार ३४७ रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सव्वादोन वर्षांपासून फरार असलेली मुख्य संशयित महिला वैशाली राया मांजरेकर (४३, आल्‍तिनो-पणजी) हिला शहापूर पोलिसांनी अटक केली.न्यायालयाने तिला सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

तपासात वैशाली मांजरेकर ही या बहुचर्चित फसवणूक प्रकरणातील प्रमुख सूत्रधार असल्याचे निष्पन्न झाले होते. गुन्हा दाखल झाल्यानंतर ती फरार झाली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार.

, शहरातील अशाच प्रकारच्या आणखी दोन फसवणूक प्रकरणांतही तिचा सहभाग असल्याचा संशय असून त्या गुन्ह्यांमध्येही तिची चौकशी केली जाणार आहे. या प्रकरणातील फिर्यादी उद्योजक संतोष पाटील यांना केंद्रीय भांडार, गोवा येथे स्टेशनरी साहित्य पुरवठ्याचे टेंडर मिळवून देण्याचे आमिष दाखविण्यात आले होते.

मुंबईतील गुन्ह्यात झाली होती अटक

फसवणूक प्रकरणानंतर फरार झालेली वैशाली मांजरेकर हिला मुंबईतील एका गुन्ह्यात अटक झाली होती. ही माहिती मिळाल्यानंतर शहापूर पोलिसांनी न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून तिचा ताबा घेतला. शहरातील आणखी दोन फसवणूक प्रकरणांत तिचा सहभाग असल्याचा संशय आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

बॉल की बुलेट...! पोलार्डला टाकला खतरनाक बाउन्सर, चेंडू थेट सीमारेषेपार; विकेटकीपर बघतच राहिला Watch Video

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; निलंबनाची याचिका फेटाळली, ECI आणि कायदे मंत्रालयाला नोटीस!

ICC Fine India West Indies: T20 मालिकेपूर्वी भारत-वेस्ट इंडिजला 'आयसीसी'चा दणका; दोन्ही संघांना ठोठावला दंड, कारण काय?

Viral Video: देवदूत बनून आला 'कॉन्स्टेबल'! चालत्या ट्रेनमध्ये चढताना प्रवाशाचा गेला तोल अन्... जीवघेण्या अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद

Most Sixes: 2026 मध्ये षटकारांचा पाऊस! अभिषेक शर्मा ठरला 'Sixer King', तर वैभव सूर्यवंशी टॉप-5 मधून बाहेर! पाहा कोणाच्या नावावर किती षटकार?

SCROLL FOR NEXT