MLA Dayanand Sopte

 

Dainik Gomantak 

गोवा

'उर्वरित विकासासाठी मोठ्या मताधिक्क्याने विजयी करा': आमदार सोपटे

दैनिक गोमन्तक

मोरजी: मांद्रे मतदासंघातील जनता ही स्वाभिमानी आणि प्रामाणिक असल्याने त्याना आता जाणीव झालेली आहे. विरोधकांच्या भूलथापाना ती बळी पडणारी नाही. भाजपा सरकारने आणि आमदार म्हणून आपण केलेल्या विकासाच्या बळावर मांद्रे मतदार तिसऱ्यांदा आपल्याला विजयी करतील असा विश्व आमदार दयानंद सोपटे (MLA Dayanand Sopte) यांनी आपला प्रचार केरी पंचायत क्षेत्रातून सुरुवातीला श्री रवळनाथ देव आणि श्री आजोबा देवाचे आशीर्वाद घेवून सुरुवात केली.

यावेळी मांद्रे भाजपा मंडळ अध्यक्ष मधु परब, सरचिटणीस संतोष कोरखणकार, सुदेश सावंत, माजी सरपंच सुरेश नाईक, रत्नाकर हरजी, महिला अध्यक्ष दीपा तळकर, अनिशा केरकर, नम्रता तळकर, महिला उत्तर गोवा अध्यक्ष नयनी शेटगावकर, माजी सरपंच प्राजक्ता कान्नायिक, माजी सरपंच एकता चोडणकर, माजी सरपंच नमिता केरकर, व मोठ्या संखेने कार्यकर्त्ये उपस्थित होते. कार्यकर्त्यांनी यावेळी भारतीय जनता पार्टीचा विजय असो, भाई सोपटे तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है. असे नारे देवून परिसर दणाणून सोडला.

यावेळी आमदार दयानंद सोपटे यांनी बोलताना केवळ भाजपच (BJP) राज्यात आणि देशात स्थिर प्रशासन देवू शकते हे पक्षाने दाखवून दिले आहे. येत्या फेब्रुवारी महिन्यात निवडणूक होणार आहे त्या निवडणुकीत भाजपला राज्यात 27 जागा मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करून, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Chief Minister Dr. Pramod Sawant) यांचे हात बळकट करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करत असतानाच या मतदार संघातून आपल्याला पुन्हा संधी द्यावी असे आवाहन केले.

महिला अध्यक्ष दीपा तळकर यांनी बोलताना मान्द्रेतील सर्व महिलांनी निर्धार केला आहे ही 80 टक्के महिला हे आमदार दयानंद सोपटे यांच्या पाठीसी राहून स्त्री शक्तीची ताकत पुन्हा एकदा या निवडणुकीत दाखवून देणार आहे. आमदार दयानंद सोपटे यांनी आपल्या मतदारांच्या प्रत्येक नागरिकांच्या वैयक्तिक प्रश्न सुद्धा सोडवण्यास हातभार लावत असतात. कोरोना काळात तर विरोधक कुठे होते हे त्यांचे त्याना माहित! मात्र आमच्या आमदाराला कोरोना होवूनही ते स्वस्थ बसले नाही, जे जे अडचणीत सापडले त्याना मदत केली आता आम्ही सर्व महिला शक्ती संघटीत होवून त्याचं बहुमतांनी विजयी करणार असे दीपा तळकर म्हणाल्या.

भाजपा मंडळ अध्यक्ष मधु परब यांनी बोलताना यंदाची निवडणूक हि ऐतिहासिक ठरणार आहे, गट निवडणुकीपेक्षा डब्बल मताधिक्य मिळवून देण्यासाठी कार्यकर्त्ये कार्यरत आहे. आज केरी गावात प्रचार सुरु झाला त्यात 90 टक्के स्थानिक नागरिक उपस्थित आहेत. आमदार दयानंद सोपटे यांची काम करण्याची पद्धत पाहिल्यास अनेक विरोधकही त्यांच्याकडे आकर्षित होताना दिसत आहे, उर्वरित विकास कामे करण्यासाठी आम्ही तिसऱ्यांदा आमदार दयानंद सोपटे याना मान्द्रेतून विजयी करणार आहोत असा विश्वास व्यक्त केला.

सरचिटणीस संतोष कोरखणकर यांनी बोलताना आमदार दयानंद सोपटे च मांद्रे मतदारसंघाचा (Mandre constituency) विकास करू शकतात हे त्यांनी दाखवून दिले आहे. कोरोना काळात केलेले कार्य मतदार कधीच विसरणार नाही. राज्यात भाजपा मजबूत करण्यासाठी नंबर वन मतदार संघातून भाजपालाच विजयी करण्याची गरज आहे. आमदार सोपटे यांची काम करण्याची पद्धत अनेकाना आवडत असून विरोधकही त्यांच्याकडे येतात आणि आपला पाठींबा देतात त्यांचेही आम्ही स्वागत करतो असे ते म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT