Pravin Arlekar News
Pravin Arlekar News Dainik Gomantak
गोवा

हातमाग कामगारांचे प्रश्न सरकार दरबारी मांडणार - आमदार प्रवीण आर्लेकर

दैनिक गोमन्तक

मोरजी: हातमाग काम करणाऱ्या सर्व कामगारांच्या समस्या आणि त्यांचे प्रश्न सरकार दरबारी मांडून सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे. अशी ग्वाही पेडणे मतदार संघाचे आमदार तथा हस्तकला महामंडळाचे चेअरमन प्रवीण आर्लेकर यांनी दिली. त्यांनी कोरगाव येथील हातमाग केंद्राला भेट देत कामगारांच्या समस्या जाणून घेतल्या. (Will try to solve the problems of handloom workers - MLA Praveen Arlekar )

पेडणे मतदार संघाचे आमदार तथा हस्तकला महामंडळाचे चेअरमन प्रवीण आर्लेकर यांनी कोरगाव येथील हातमाग केंद्राला भेट दिली. व तेथील कामकाज कशा पद्धतीने चालू आहे ? कोण कोणत्या अडचणी आहेत ? कोणत्या प्रकारच्या समस्या आहेत ? याची माहिती जाणून घेतली. या केंद्रामध्ये प्रशिक्षणार्थ्यांनी आपल्या गोमंतकातील सुप्रसिद्ध श्री कुणबी नृत्यासाठी वापरणारे कुणबी साडी टॉवेल चादरी अशा विविध प्रकारची वस्त्रे या कामगारांनी तयार केली आहेत. (Pravin Arlekar News)

परंतु या कामगारांना संबंधित खात्याकडून केवळ सूत दिले जाते. मात्र त्यांना मोबदला दिला जात नाही. एखाद्या वेळी एक वस्त्र जर विक्रीला गेले तरच या कामगारांना तो मोबदला अल्प दिला जात आहे. त्यापेक्षा या सर्व कामगारांना सरकारने हंगामी स्वरुपाचे नोकरीत सामावून घेऊन काम करून घ्यावे अशी मागणी या कामगाराने आमदार प्रवीण आर्लेकर यांच्याकडे चर्चा करताना आणि आपल्या कैफयती मांडताना केली आहे.

आमदार प्रवीण आर्लेकर यांनी यावेळी बोलताना सांगितले मशीनद्वारे जे कपडे तयार होतात. ते त्याहीपेक्षा चांगल्या दर्जाचे हातमाग कापड या कामगाराने या हातमाग केंद्रातून बनवलेले आहे. आणि या कपड्यांचा जास्तीत जास्त नागरिकांनी वापर करून या हाताना काम देण्याची गरज आहे. सरकारने अशा हस्त कलाकारांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी आपण सरकार दरबारी प्रयत्न करणार आहे. असे सांगून आपण प्रत्यक्ष कामगारांना भेटून त्यांच्या समस्या जाणून घेतलेले आहेत. यापुढे या कामगारावर अन्याय होणार नाही अशी ग्वाही आमदार प्रवीण आर्लेकर यांनी दिली.

यावेळी आपली कैफियत मांडताना निदान आम्हाला नियमित कामावर ठेवणे सरकारला शक्य नसेल तरी सरकारने आम्हाला हंगामी स्वरुपाचे कामावर ठेवण्यासाठी योजना आखून आमच्यावर जो अन्याय होतो. तो अन्याय दूर करावा अशी मागणी महिला कामगारांनी आमदाराच्या उपस्थित केली.

पेडणे तालुक्यात पाच हातमाग केंद्र कार्यरत आहेत. आणि या हातमा केंद्रामागे किमान 15 ते 20 प्रशिक्षणार्थी कामगार कार्यरत असतात. या हात माग विणकाम करण्यासाठी महिन्याला केवळ साडेसातशे रुपये मानधन घेऊन प्रशिक्षण घ्यावे लागते. आणि प्रशिक्षण घेतल्यानंतर त्यांना कुठल्याच प्रकारचे काम किंवा हात मागावर नोकरी मिळत नाही.

एखाद्याने सहा महिन्याचे प्रशिक्षण घेतल्यानंतर त्याला नोकरी मिळावी किंवा काम मिळावी असे वाटत असते. परंतु हातमाग केंद्रात च्या नियमानुसार सध्या ज्या प्रशिक्षणार्थ्यांनी आपले प्रशिक्षण पूर्ण केले. त्यांना जर काम करायचे असेल तर हात माग केंद्रावर काम करता येते आणि त्यासाठी हात माग केंद्र कापड विणण्यासाठी सुत आणि साहित्य उपलब्ध करून देतात. प्रशिक्षणार्थ्यांनी त्यासाठी काम करावे.

साडी टावेल व इतर तयार केल्यानंतर जर एखादी साडी विकली गेली तरच त्या कामगाराला त्याचा मोबदला मिळतो. अन्यथा काम मोफत करावे लागते. हा नियम आहे. हा नियम सरकारने बदलून ज्या प्रशिक्षणार्थ्यांनी आपले प्रशिक्षण पूर्ण केले किंवा ज्यांना काम करण्याचा जास्त अनुभव आहे. अशा महिला कामगारांना हंगामी स्वरूपाची नोकरी द्यावी आणि वेळेवर मानधन द्यावे. अशी मागणी कामगाराकडून केली जात आहे.

याकडे हातमाग केंद्र विभागाचे तथा खात्याचे मंत्री रवी नाईक पेडणे तालुक्यातील दोन्ही मतदार संघाचे आमदार जीत आरोलकर, प्रवीण आर्लेकर यांनी यात लक्ष घालून स्थानिक कामगारांना हंगामी स्वरूपाच्या नोकऱ्या उपलब्ध करून देण्यासाठी सरकारकडे प्रयत्न करावेत अशी मागणी पुढे येत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bodgeshwar Temple Theft: बोडगेश्वर मंदिरात चोरी करणारी टोळी जेरबंद; चौघांना सावंतवाडीतून अटक

UEN For Goa Students: गोव्यात बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मिळणार पर्मनंट एज्यूकेशन नंबर, कसा होणार फायदा?

‘या’ देशाच्या माजी मंत्र्याच्या पत्नीची निर्घृण हत्या, खळबळजनक खुलासा; व्हिडिओ पाहून तुम्हालाही बसेल धक्का

Loksabha Election 2024 : एनडीए आघाडीला २०० पार होणेही मुश्कील : डॉ. शशी थरूर

Supreme Court: राष्ट्रीय ग्राहक आयोगाच्या सदस्यांना कोर्टाने फटकारले; आदेशाच्या उल्लंघनबाबत बजावली अवमानाची नोटीस

SCROLL FOR NEXT