Zuari Bridge Dainik Gomantak
गोवा

Zuari Bridge: झुआरी पुलाच्या उभारणीनंतर वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटेल?

वाहतुकीसाठी महत्वाच्या मानल्या गेलेल्या या पुलामुळे वाहतूक कोंडीची समस्या काही प्रमाणात सुटण्याची चिन्ह आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

गुरूवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते नवीन झुआरी पुलाच्या पश्चिमेकडील 4 लेनचे उद्घाटन करण्यात आले आणि शुक्रवारी दुपारी पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. वाहतुकीसाठी महत्वाच्या मानल्या गेलेल्या या पुलामुळे वाहतूक कोंडीची समस्या काही प्रमाणात सुटण्याची चिन्ह आहेत. मात्र दोनपेक्षा जास्त लेनमुळे विशेषतः वेर्णा आणि बांबोळी - जिथे नवीन झुआरी पुलाचे चार लेन आणि त्याचे विस्तारित मार्ग एकमेकांना छेदतात त्याठिकाणी वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे.

बांबोळी चौक-

बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या आजूबाजूचा परिसर हा एक भाग आहे, जिथे झुआरी पूल उत्तरेकडील जुन्या महामार्गाला छेदतो. इथे बऱ्यापैकी रहदारी आहे आणि उत्तरेकडून - पश्चिमेकडून (डोना पॉला-गोवा विद्यापीठ) - अनेक दिशांना जोडणाऱ्या वाहनांसाठी नवीन उपाय शोधणे आवश्यक आहे. कारण येथे वाहतुकीच्या दिशा दर्शक चिन्हाचा अभाव हा ड्रायव्हर्सना गोंधळात पडणारा आहे. तसेच जंक्शनची रचना चुकीची आहे.

वेर्णा औद्योगिक क्षेत्र-

जुन्या पुलाचे कालबाह्य डिझाइन आणि कमकुवतपणा ही वस्तुस्थिती होती. पण आता नवीन पूल कार्यान्वित झाला आहे त्यामुळे वाहतुकीच्या मार्गातील सर्व अडथळे दूर केले जातील असे गृहीत धरले जातेय. त्यामुळे वेर्णा सिग्नल जंक्शनवर चारही दिशांनी पणजी आणि मडगावपासून दोन उत्तर-दक्षिण दिशांना, पश्चिमेकडून, मुरगावहून 4-लेन हायवेने येणारी आणि फोंड्याकडून येणार्‍या रस्त्याने जाणारी वाहतूक औद्योगिक वसाहत NH-66 मध्ये सामील होईल.

अनेक दाट लोकवस्तीची गावे नवीन झुआरी पुलाच्या पट्ट्यात आणि त्याच्या दोन्ही बाजूंना वेर्णा येथील टोयोटा शोरूम आणि बांबोळी येथील गोवा मेडिकल कॉलेज क्षेत्रादरम्यान जोडली जातात. या गावांमध्ये राहणारे लोक त्यांच्यासाठी प्रवेश आणि बाहेर पडण्याचे ठिकाण उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने अपुरेपणा दिसून येतोय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News: सरकारी, सार्वजनिक भूखंडांवर राहणार आता कडक नजर! तालुकानिहाय पथके स्थापन; सुट्ट्यांच्या दिवशीही कडक देखरेख

Goa Theft: गोव्यात चोरट्यांचा धुमाकूळ! म्हापसा, पर्वरी, थिवी, कोलवाळ परिसरात 7 घरे फोडली; लाखोंचा ऐवज लंपास

Goa Accident Death: अंजुणे धरणाजवळ भीषण अपघात! युवतीचा मृत्यू, 5 प्रवासी जखमी

Rashi Bhavishya: 'या' राशींनी आता थांबायचं नाय! नवीन संधी दरवाजा ठोठावणार; तयार रहा

Arijit Singh Retirement: मनोरंजनसृष्टीला मोठा धक्का, अरिजीत सिंगचा प्लेबॅक सिंगिंगला रामराम; पोस्ट करत म्हणाला, "मी आतापासून..."

SCROLL FOR NEXT