Durgadas Kamat Dainik Gomantak
गोवा

'सरकारी नोकऱ्या संदर्भातील भ्रष्टाचाऱ्यांची मुख्यमंत्री चौकशी करतील का?'

नोकऱ्यांसाठी पैसे घेत असलेल्या एजन्टांवर तक्रारी करुनही काहीच कारवाई होत नाही असे गोवा फॉरवर्डचे (Goa Forward) सरचिटणीस दुर्गादास कामत (Durgadas Kamat) व विकास भगत यांनी मडगावी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

दैनिक गोमन्तक

सासष्टी: सद्या सरकारी नोकऱ्या देण्यासंदर्भात भयंकर भ्रष्टाचार चालू आहे. सरकारी नोकऱ्यांसाठी पैशांची मागणी चालू आहे. काही एजन्ट कार्यरत आहेत असे स्वता मुख्यमंत्र्यानी म्हटले आहे. पण नोकऱ्यांसाठी पैसे घेत असलेल्या एजन्टांवर तक्रारी करुनही काहीच कारवाई होत नाही असे गोवा फॉरवर्डचे (Goa Forward) सरचिटणीस दुर्गादास कामत (Durgadas Kamat) व विकास भगत यांनी मडगावी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले. काणकोण येथील एका युवकाकडुन सरकारी नोकरीसाठी साखळी येथील एक व्यक्ती रामेश्र्वर मांद्रेकर (Rameshwar Mandrekar) यांनी पाच लाख रुपये घेतले होते. त्या संदर्भात 3 एप्रिल 2021 या दिवशी काणकोण पोलिस चौकीत तक्रार नोंद केली होती. पण मुख्यमंत्र्यांनी या तक्रारीची दखल घेतली नाही व कारवाईही केली नसल्याचे भगत यानी सांगितले.

सद्या सरकारी नोकऱ्यासाठी पावणी सुरु आहे. सरकारी नोकऱ्या योग्यतेवर मिळाल्या पाहिजे. जर कुठल्याही खात्यातील सरकारी अधिकारी राजकीय दबावाखाली योग्यता नसलेल्यांना सरकारी नोकरीत समाविष्ट करुन घेत असतील तर आपल्या पक्षाचे सरकार सत्तेवर आल्यावर या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल असा ईशारा दुर्गादास कामत यानी दिला. भारतीय जनता पक्ष निराश झाला असुन सरकारी नोकऱ्या त्यानी घाऊक बाजारात विक्रीस काढलेल्या आहेत अशी टिकाही कामत यानी केली. पुढील 20-25 दिवसात निवडणुक आचारसंहिता लागू केली जाण्याची शक्यता असल्याने बेकार युवकांनी व त्यांच्या पालकांनी अशा आमिषांना बळी पडू नये असा ईशारा कामत यानी दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: चिकन-मटन विसरा, इथे मिळतात चक्क 'कोब्रा सापाचे भजी अन् समोसे', खवय्यांची होते मोठी गर्दी; व्हिडिओ पाहून चक्रावले नेटकरी

Death Penalty News: लाखो निष्पापांच्या रक्ताने माखलेले हात, 24 वर्षांच्या जुलमी राजवटीचा भयानक अंत; 'या' देशाच्या माजी राष्ट्राध्याक्षासह भावाला फाशीची शिक्षा

Abhishek Porel Arrested: लव्ह, सेक्स अन् ब्लॅकमेलिंग! 23 वर्षीय स्टार आयपीएल खेळाडूला बलात्कार प्रकरणात अटक; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोठी कारवाई

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

SCROLL FOR NEXT