Cm Pramod Sawant  Dainik Gomantak
गोवा

Colva Fisherman : कोलवा येथील मच्छीमारांचे प्रश्न सोडविणार : मुख्यमंत्री

Colva Fisherman : या जागेतून आम्हाला हटवू नये, अनेक दशकांपासून आम्ही मच्छीमारी व्यवसाय करीत आहोत, असे लिब्रेटा फर्नांडिस यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले.

गोमन्तक डिजिटल टीम

Colva Fisherman :

सासष्टी, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल संध्याकाळी कोलव्याला भेट देऊन तेथील मच्छीमारांच्या समस्या व प्रश्र्न जाणून घेतले व ते सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्र्वासन दिले.

पर्यटन खात्यातर्फे मच्छीमारांना तिथून दुसरीकडे हलविण्याचा प्रयत्न होत असल्याचे मुख्यमंत्र्यांना सांगण्यात आले. यासंदर्भात आपण कायदेशीर बाजू समजून घेऊन त्यावर उपाय काढू, असे मुख्यमंत्र्यांनी मच्छीमारांना सांगितले.

पर्यटन खात्याच्या जागेत मच्छीमारांच्या काही झोपड्या आहेत. त्यात ते मासळी सुकवत असतात. शिवाय तेथे ते जाळी, मासळीवर मारण्यासाठी मीठ वगैरे ठेवतात. पर्यटन खात्याने या झोपड्या हटविण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा मच्छीमारांनी कडक प्रतिकार करून त्या वाचविल्या होत्या.

या जागेतून आम्हाला हटवू नये, अनेक दशकांपासून आम्ही मच्छीमारी व्यवसाय करीत आहोत, असे लिब्रेटा फर्नांडिस यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले.

पत्रकारांकडे बोलताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले, की आपण मच्छीमारांचे म्हणणे ऐकून घेतले आहे. त्यांचे प्रश्र्न व समस्या कायदेशीर किंवा इतर बाजूने कशा सोडविता येतात त्याचा अभ्यास करून निर्णय घेतला जाईल. त्यांचा सीआरझेडसंदर्भात प्रश्र्न होता, त्यांच्या भाडेपट्टीच्या नूतनीकरण सवलतीबद्दल सकारात्मकरित्या निर्णय घेतला जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Calangute: कळंगुट पंचायतीची मोठी कारवाई! 22 अतिक्रमणांवर हातोडा; मोठ्या संख्येने पोलिस फौजफाटा तैनात

Bits Pilani: बंदी असलेले ‘सिंथेटिक्‍स ड्रग्‍स’ मिळाले कसे? बिट्स कॅम्‍पसमध्‍ये पोलिस तैनात; ‘स्‍विगी बॉईज्‌’वर संशयाची सुई

Rashi Bhavishya 12 September 2025: घाईघाईत निर्णय घेऊ नका, संयमाने वागल्यास अडचणी दूर होतील; मानसिक शांततेसाठी विश्रांती घ्या

Samsung Galaxy F17 5G: सॅमसंगचा धमाका! दमदार बॅटरी आणि शानदार फीचर्ससह स्मार्टफोन लॉन्च; जाणून घ्या किंमत आणि बरच काही...

Chhattisgarh: छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई! 10 नक्षलवादी ठार, 1 कोटींचा इनाम असणारा कमांडर बालकृष्णही ढेर

SCROLL FOR NEXT