Bilawal Bhutto Zardari Dainik Gomantak
गोवा

Bilawal Bhutto India Visit: पाकिस्तान दाऊदला भारताकडे सोपवणार का? काय म्हणाले बिलावल भुट्टो, वाचा...

काश्मिरमधून कलम 370 हटविणे पाकिस्तानला अजुनही टोचते

Akshay Nirmale

Bilawal Bhutto on Dawood Ibrahim: शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) परिषदेच्या बैठकीसाठी गोव्यात आलेले पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांनी कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्याबाबत मोठे वक्तव्य केले आहे. इंडिया टुडेसाठी ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी घेतलेल्या मुलाखतीत भुट्टो बोलत होते.

(SCO Summit Goa 2023)

या विशेष मुलाखतीत सरदेसाई यांनी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला भारताच्या ताब्यात दिले तर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव कमी होईल का, असा प्रश्न विचारला होता.

त्यावर बिलावल भुट्टो यांनी काश्मीरमधील भारताच्या धोरणावर भाष्य केले. त्यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील गोठलेल्या संवादाला दोष दिला आणि कराचीत राहणारा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला ताब्यात दिल्याने तणाव कमी होईल की नाही हे मान्य करण्यास नकार दिला.

दाऊद इब्राहिम कराचीच्या क्लिफ्टनमध्ये राहत असल्याचे समजते. हे असे समोर येत असताना भारत दहशतवादावर कारवाई करण्यासाठी पाकिस्तानवर कसा विश्वास ठेवू शकतो, असे सरदेसाई यांनी विचारले.

त्यावर भुट्टो म्हणाले की, "गोठवलेली शांतता ही 5 ऑगस्ट 2019 रोजी भारताने केलेल्या कारवाईचा (काश्मिरमधून कलम 370 हटवणे) परिणाम आहे. तेव्हा भारताने एकतर्फीपणे आंतरराष्ट्रीय कायद्याचे, संयुक्त राष्ट्रांच्या ठरावांचे आणि भारत आणि पाकिस्तानमधील द्विपक्षीय करारांचे उल्लंघन केले.

भुट्टो म्हणाले की, जर आम्हाला काही कटिबद्धता पाळायची असेल किंवा जर दोन्ही देशांमध्ये काही संवाद साधायचा असेल तर त्याचे लिखित दस्तऐवज किंवा लेखी करार होतील. द्विपक्षीय आणि बहुपक्षीय करारांबाबत भारताच्या कटिबद्धतेवर पाकिस्तानचा विश्वास नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, कराचीमध्ये वास्तव्यास असलेल्या आणि 1993 च्या मुंबईतील साखळी बॉम्बस्फोटांसह भारतात अनेक दहशतवादी कारवायांसाठी हवा असलेल्या दाऊद इब्राहिमच्या डोक्यावर 2003 मध्ये संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने जाहीर 25 दशलक्ष डॉललचे इनाम जाहीर केले आहे.

लष्कर-ए-तैयबा (LeT) प्रमुख हाफिज सईद, जैश-ए-मोहम्मद (JeM) प्रमुख मौलाना मसूद अझहर, हिजबुल मुजाहिदीनचा संस्थापक सय्यद सलाहुद्दीन आणि त्याचा जवळचा सहकारी अब्दुल रौफ असगर यांच्यासह तो भारताला हव्या असलेल्या मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांपैकी एक आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT