Goa Beach
Goa Beach Dainik Gomantak
गोवा

Goa Beach: गैरकृत्यांपासून किनारे मुक्त होतील?

गोमन्तक डिजिटल टीम

किनारी भागांतील कधीही न संपणाऱ्या गैरप्रकारांमुळे रोज नव्याने गोव्याचे नाव देश पातळीवरील माध्यमांमध्ये झळकत आहे. समुद्रकिनाऱ्यांवरील बेकायदेशीर बांधकामांपासून ते बेकायदेशीर फेरीवाल्यांपर्यंत, ड्रग्समुळे होणाऱ्या मृत्यूंपासून ते नाईट क्लबमधील क्रूर हल्ल्यांपर्यंत, समुद्रकिऱ्यांवरील कुत्र्यांच्या हल्ल्यापासून ते पहाटे उशिरापर्यंत मोठ्या कर्णकर्कश आवाजातील संगीत पार्ट्यांपर्यंत वाढत्या यादींमुळे गोव्याची बदनामी होत आहे.

हणजूण परिसरात दिल्लीमधील एका पर्यटक कुटुंबावर स्थानिकांनी नुकत्याच केलेल्या प्राणघातक हल्ल्यामुळे गोव्याचे नाव वाईट गोष्टीसाठी पुन्हा प्रकाशझोतात आले. या गोष्टीची दखल गृहमंत्री असलेल्या खुद्द मुख्यमंत्र्यांना गांभीर्याने दखल घ्यावी लागली. विशेष म्हणजे, या कुटुंबाने गोवा पर्यटकांसाठी सुरक्षित नाही, असा दावा कथित व्हिडिओमधून केला होता.

समुद्रकिनारी पर्यटन हंगामाला चार महिने शिल्लक असताना सरकारने आणीबाणीची पावले उचलून केवळ पर्यटक आणि स्थानिकांचे हित साधले नाही तर जागतिकस्तरावर गोव्याची रोज नाच्चकी होत राहिल.

चर्चेतल्या घटना-

  •  अभिनेत्री तथा भाजप नेत्या सोनाली फोगाट यांच्या हत्येमुळे गोव्याचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर बरेच गाजले.

  •   2008 साली हणजूण किनाऱ्यावर स्कार्लेट या अल्पवयीन ब्रिटीश मुलीला अत्याचार करून संपवले होते.

  •   कळंगुटमधील काही डान्सबार सील केले,पण अजूनही काही डान्सबार सुरू असल्याची चर्चा आहे.

  •   डिसेंबर 2021 मध्ये कळंगुटचे सोझा लोबो रेस्टॉरंट तोडफोड, हल्ला प्रकरण गाजले.न्यायालयाने 26 जणांविरुध्द रोप निश्चितीचा आदेश दिला आहे.

  •   हणजूण, मोरजी या किनारी भागात कर्णकर्कश पार्ट्यां चालतात. पोलीस, प्रशासकीय यंत्रणा मात्र, याकडे डोळेझाक करते.

फसवणूक, मारहाणीचे प्रकार पर्यटन उद्योगाला मारक

गोव्यात पर्यटकांची फसवणूक आणि मारहाण होत असल्याचे प्रकार सातत्याने घडू लागले असून याचा वाईट परिणाम पर्यटन उद्योगावर होऊ शकतो, म्हणून पर्यटन उद्योगाशी निगडित घटकांमध्ये चिंता वाढला आहे. राज्यातील पर्यटन हंगाम सुरळीतपणे पार पडावा यासाठी स्थानिक आणि पर्यटकांनी नियमांचे पालन करणे आवश्‍यक आहे. तसेच पोलिसांनी संवेदनशीलपणे काम करण्याची आवश्‍यकता असल्याच्या प्रतिक्रिया घटकांकडून व्यक्त केल्या जात आहे.

हणजूण येथे पर्यटकांना हॉटेल कर्मचाऱ्यांकडून मारहाण सध्या राष्ट्रीय पातळीवर चर्चेचा विषय बनला आहे. मुख्य म्हणजे पीडितांच्या कुटुंबीयांनी सोशल मीडियाद्वारे मारहाणीचा व्हिडियो व्हायरल केल्यानंतर पोलिसांनी योग्यरीत्या प्रकरण हाताळले नसल्याचे उघड झाले आहे.

हल्लीच हणजूण येथे जपानी पर्यटकाला सुमारे 9 लाख रुपयांना गंडवले होते, तेव्हा घटनेची दखल घेत जपानी दुतावासाने त्वरित सूचना जारी केली होती. त्याशिवाय मुरगाव बंदरावर आलेल्या क्रूझ जहाजातील अमेरिकन पर्यटकांना त्यांच्यासाठी आणलेल्या बसऐवजी टॅक्सी वापरावी यावरून मोठा गदारोळ माजला होता.

कंटाळून पर्यटक जहाजात परतल्याने राज्याची छबी खराब झाली होती. त्याशिवाय कोल्हापूरवरून आलेल्यांना मसाज पार्लरमध्ये नेण्याच्या आमिषाने मारहाण करून लुटण्याचा प्रकार घडला होता. तसेच जुने गोवा येथे चर्चमध्ये प्रवेश करण्यावरून पर्यटकांना गोंधळ करण्याची घटना काल घडली. पर्यटकांनीही नियमांचे पालन करणे अपेक्षित आहे.

मारहाणाचे प्रकरण लज्जास्पद असून यातून गोव्याची छबी खराब होत आहे. गोवा शांत आणि येथील स्थानिक मैत्रिपूर्ण आणि सौम्य असून पर्यटक येते येण्यास पसंती दर्शवतात. परंतु असल्या प्रकारांमध्ये वाढ झाल्याने आम्ही चुकीच्या दिशेने जात आहोत. हॉटेल कर्मचाऱ्यांना कौशल्य प्रशिक्षण देण्याची आवश्‍यकता आहे. तसेच पोलिसांनीही जबाबदारीने काम केले पाहिजे.

- नीलेश शहा, अध्यक्ष, टीटीएजी

मारहाणीच्या घटनेला दोन बाजू असून हॉटेल कर्मचारी आणि पर्यटक दोघांची चूक आहे, परंतु कर्माचाऱ्यांनी कायद्याचे पालन करायला हवे होते. आज गोव्यात येणाऱ्यांना पोलिसांचा धाक नसल्याने सर्रास नियम मोडले जात आहेत. राजकीय हस्तक्षेपामुळे पोलिसांना आपले काम नीट करता येत नाही. पोलिसांचा धाक निर्माण झाल्याशिवाय स्थिती सुधारेल असे वाटत नाही.

- सावियो मसेएस, माजी अध्यक्ष, टीटीएजी

हॉटेल मालकांना ‘प्रोटेक्शन मनी’साठी धमक्या !

कळंगुट मतदारसंघातील काही रेस्टॉरंट मालकांना दोन बदमाशांकडून ‘प्रोटेक्शन मनी’साठी धमकी दिली जात आहे. याबाबत मुख्यमंत्री प्रमोद सावंत व पोलिस महासंचालकांना आपण पत्र लिहिणार असल्याचे आमदार मायकल लोबो म्हणाले.

दरम्यान, पोलिस स्थानकात अशी कुठलीच तक्रार अद्याप दाखल झालेली नाही, असे सूत्रांनी सांगितले. याविषयी मुख्यमंत्र्यांनी असा प्रकार घडला असल्यास त्या लोकप्रतिनिधीने तक्रार द्यावी, असे आवाहन केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cashew Fest Goa 2024: ध्वनी भानुशालीचे सादरीकरण, डिजे हर्षा; काजू महोत्सवाच्या पहिल्या दिवासाची झलक Video

Panaji News : वितरणातील त्रुटींमुळेच पाणीटंचाईचे संकट; मुख्य अभियंता प्रमोद बदामी

Congo Violence: काँगोमध्ये हिंसाचार सुरुच! विस्थापितांच्या छावणीवर बॉम्ब हल्ला; 35 जणांचा मृत्यू

Margao News : उल्‍हास वेर्लेकर कुटुंबीयांकडून विविध संस्‍थांना १० लाखांची देणगी; लग्नाच्या वाढदिनी भेट

Mumbai Goa Highway Traffic: मुंबई-गोवा महामार्गावर पुन्हा वाहतूक कोंडी! वाहनांच्या लांबच लांब रांगा

SCROLL FOR NEXT