Mopa Airport
Mopa Airport Gomantak Digital Team
गोवा

Mopa Airport : विमानतळांवर मद्यालये उघडणार?

गोमन्तक डिजिटल टीम

मद्यालयांना परवाना देण्याच्या कायद्यात शिथिलता आणून ज्या भागात परवानगी देता येत नाही, तेथे ती देण्याच्या जोरदार हालचाली एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याकडे ते काम सोपवून सुरू झाल्याने गोवा मद्यव्यापार संघटना आक्रमक झाली आहे. मोपा व दाबोळी विमानतळावर मद्यदुकानांना परवानगी देणारा सूत्रधार गोव्यातील एक वजनदार राजकारणी आहे. त्याने मुंबईस्थित मद्यव्यावसायिकाशी भागिदारीतून हा व्यवसाय सुरू करण्यासाठी जोरदार प्रयत्न चालविल्याने संघटनेने नाराजी व्यक्त केली आहे.

संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज गुरुवारी अबकारी आयुक्त नारायण गाड यांची भेट घेतली. मोपा व दाबोळी विमानतळावर मद्यदुकानांना परवाना देण्यासंदर्भात काही प्रकार सुरू आहे का, असे विचारले असता त्यांनी याबाबत काहीच माहिती उपलब्ध नसल्याचे संगितले. या हालचालींबाबत संघटनेने आक्षेप घेतला व परवानगी दिल्यास राज्यातील घाऊक तसेच किरकोळ मद्यविक्रेत्यांवर मोठा परिणाम होणार असल्‍याने परवानगी दिली जाऊ नये अशी मागणी केली.

संघटनेचे अध्यक्ष दत्तप्रसाद नाईक म्हणाले की, गोवा हे पर्यटन राज्य असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. राज्यातील मद्यव्यवसाय हा पूर्णपणे पर्यटकांवर अवलंबून आहे. राज्यात सीलबंद मद्य बाटल्यांची विक्री करणारे सुमारे 3076 विक्रेते तथा दुकाने आहेत. तर, रेस्टॉरंट्‌स व हॉटेल्समध्ये मद्यविक्री करणारे सुमारे 7998 परवानाधारक आहेत.

विमानतळावर मद्य दुकाने सुरू केल्यास गोव्यातून जाणारे पर्यटक विमानतळावरच मद्य बाटल्या खेरदी करतील. त्याचा फटका अन्‍य मद्यविक्रेत्‍यांना बसणार आहे. या व्यवसायात असलेले अनेक मद्यविक्रेते सरकारच्या या हालचालीमुळे नाराज झाले आहेत. हा व्यवसाय डळमळीत झाल्यास अनेक जण बेरोजगार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

यापूर्वीचा प्रयत्‍न पाडला होता हाणून

सीलबंद मद्य बाटल्या विक्री करणारे व्यापारी हे सर्वाधिक बार्देश तालुक्यात (1046) आहेत. या तालुक्यात किनारपट्टी परिसर येत असल्याने अनेकांनी ही मद्याची दुकाने सुरू केली आहेत. त्यापाठोपाठ सासष्‍टीत 580 तर तिसवाडीमध्ये 379 दुकाने आहेत. सर्वाधिक कमी सांगे (42) तालुक्यात आहेत. गेल्या एक महिन्यापासून संघटनेने मुख्यमंत्र्यांकडे भेटण्याची वेळ मागितली, मात्र अजूनही त्यांनी ती दिलेली नाही.

यापूर्वीही दाबोळी विमानतळावर एका दिल्लीस्थित व्यापाऱ्याने मद्य दुकानांच्या परवान्यासाठी प्रयत्न केला होता. तेव्हा संघटनेने आक्षेप घेऊन आवाज उठवल्यावर तो स्थगित ठेवण्यात आला होता. त्यामुळे कोठेतरी पाणी मुरतेय असे या एकंदर प्रकरणावरून दिसून येत असल्याचे मत काही मद्यविक्रेत्‍यांनी व्यक्त केले.

देशातील काही विमानतळांवर मद्यदुकानांना परवानगी देण्यात आलेली आहे. तीच संकल्पना गोव्यातील विमानतळांवर सुरू करण्यासाठी मुंबईततील एका व्यावसायिकाने सरकारशी संपर्क साधला आहे. त्यासाठी सरकारने हालचालीही सुरू केल्या आहेत. येत्या काही दिवसांत नियमात शिथिलता केलेली अधिसूचनाही येऊ शकते. पण त्याचा परिणाम मद्यव्यावसायिकांवर होईल असा कोणताही निर्णय घेऊ नये अशी आमची मागणी आहे.

दत्तप्रसाद नाईक, गोवा मद्यव्यापार संघटनेचे अध्‍यक्ष

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's Top News: लोकसभा मतदानाला उत्सफूर्त प्रतिसाद, आता नजर निकालाकडे; गोव्यातील ठळक बातम्या

‘’दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींसाठी सेलिब्रिटी अन् सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर तितकेच जबाबदार’’, पतंजली प्रकरणात SC ची कठोर टिप्पणी

Panaji: भूक लागलीय, भजी कोठे मिळतील? केस काळे केले म्हणून कोणी 'भाऊ' होत नाही; पणजीतील मतदाराचा नाईकांवर रोष

अमेरिकेनं बनवलं AI द्वारा कंट्रोल होणारं पहिलं फायटर जेट F16; व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल...

Goa Loksabha Voting: उरले दोन तास! गोव्यात दुपारी तीनपर्यंत 61.39 टक्के मतदान

SCROLL FOR NEXT