turtle goa.jpg 
गोवा

Goa: वन्यजीवांनाही वादळाचा फटका; कासवांची 335 अंडी नष्ट

दैनिक गोमंतक

पणजी: वादळमुळे (Cylone) केवळ मानवी जीवनालाच हानी (Impact) होते असे नाही तर वन्य जिवांनादेखील (Wildlife) त्याचा फटका बसतो, अशी माहिती अतिरिक्त प्रधान वनसंरक्षक संतोषकुमार यांनी गोमन्तकला दिली. तौक्ते वादळात (Cyclone Tauktae) काणकोण तालुक्यातील गालजीबाग या कासवांसाठी संरक्षित समुद्र किनाऱ्यावर कासवांची (Turtle) 335 अंडी (Eggs) नष्ट झाल्याची माहिती त्यांनी दिली. मुदलात, वादळाचा जास्त फटका हा पक्षांना बसला आहे. (Wildlife in Goa has been hit by the Cyclone Tauktae)

तौक्ते वादळाने राज्यातील सर्वसामान्यांचे मोठे नुकसान केले. त्यात विशेषत: पिके आणि फळबागांचे नुकसान अधिक झाले. वादळाचा फटका वन्यजीवांनाही बसतो, असे निरिक्षण राज्याचे अतिरिक्त प्रधान वनसंरक्षक संतोषकुमार यांनी नोंदविले आहे. वादळामुळे जंगलात मोठ्या प्रमाणात झाडांची पडझड झाली आहे. त्याची मोजदाद सुरू आहे. तरीही सुदैवाने तितकेसे नुकसान झाले नसल्याचे त्यांचे मत आहे. 

काणकोण येथील गालजीबाग समुद्र किनारा कासवांसाठी संरक्षित आहे. दक्षिण गोव्यात 47 तर उत्तर गोव्यातील किनाऱ्यांवर 24 खड्ड्यात कासवांचे संवर्धन केले जाते. गालजीबाग येथील खड्ड्यातील 335 अंडी वादळामुळे नष्ट झाली आहेत. त्याशिवाय वन खात्याच्या इमारतींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पणजी येथील मुख्य कार्यालय आणि पैंगीण येथील विश्रामधामाच्या छप्पराचे वादळामुळे नुकसान झाले असल्याची माहिती संतोषकुमार यांनी दिली. वनखात्याला एकूण 47 लाखांचा आर्थिक फटका बसल्याचे ते म्हणाले. 

गोव्यातील हतबल कुटूंबाने ओडिशा सरकारला मारली मदतीची हाक...
वादळाचा फटका हा सगळ्याच घटकांना समप्रमाणात बसतो. विशेषतः पक्ष्यांना वादळामुळे अधिक फटका बसतो. खरंतर हा पक्षांचा विणीचा हंगाम, याच दरम्यान वादळ झाल्यामुळे पक्षांची घरटी उद्ध्वस्त झाली. अंडी फुटली. त्यामुळे त्यांच्या प्रजननात घाट शक्य आहे, असे मत पक्षी अभ्यासक व्यक्त करतात. पक्षाना वादळाची कल्पना असते पण त्यांना सुरक्षित स्थळी आसरा घेणे अवघड असते.

कासवाची अंडी नष्ट होणे ही खेदाची बाब
प्राण्यांना नैसर्गिक आपत्तीची सर्वात आधी कल्पना येते, त्यामुळे ते सुरक्षितस्थळी आसरा शोधतात. त्यामुळेच वन्य जिवांना वादळाचा म्हणावा तेवढा फटका बसत नाही. पण, तरीही वादळी वारे, वीज आणि पावसामुळे वन्य जीव सैरभैर होतात. समुद्री कासवांना मात्र वादळाचा अधिक फटका बसतो. राज्यातील कासव संवर्धन किनाऱ्यांवर कासवाची अंडी नष्ट होणे ही खेदाची बाब असल्याचे मत अतिरिक्त प्रधान वनसंरक्षक, संतोष कुमार यांनी व्यक्त केले आहे. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

डिचोलीत दिवाळीचा उत्साह शिगेला! नरकासुर प्रतिमांनी वेधलं लक्ष; बाजारपेठेत खरेदीसाठी प्रचंड गर्दी

Viral Video: ट्रेनमध्ये चोरी करायला गेला अन् स्वतःच अडकला! खिडकीतून हात घालताच प्रवाशांनी चोराला पकडलं; 94 सेकंदांचा व्हिडिओ व्हायरल

Accident Death: तन्मयची दिवाळी ठरली अखेरची! डिचोलीत भीषण अपघातात 22 वर्षीय युवकाचा मृत्यू

VIDEO: दिलदार केएल राहुल! सामना संपल्यानंतर महिला कर्मचाऱ्याला दिलं सरप्राईज; महागडा फोन केला गिफ्ट

Bicholim: डिचोली मंदिर परिसरात कोसळली झाडाची फांदी, अनर्थ टळला; वीजखांब मोडला, अडीच तास वीजपुरवठा खंडित

SCROLL FOR NEXT