Farmer Dainik Gomantak
गोवा

Sattari: सत्तरीत रानटी प्राण्यांचा हैदोस, बागायती पिकांचे मोठे नुकसान; शेतकरी संतप्त मात्र सरकार उदासीन

Wild Animals: सत्तरी तालुक्यात सध्या विविध गावांत गवे, रानडुक्कर, खेती, माकड यांचा मुक्त संचार दिसून येतो आहे.

Manish Jadhav

वाळपई: सत्तरी तालुक्यात सध्या विविध गावांत गवे, रानडुक्कर, खेती, माकड यांचा मुक्त संचार दिसून येतो आहे. या वन्य प्राण्यांकडून होणारे प्रचंड नुकसान शेतकरी, बागायतदारांच्या जीवावर बेतलेले आहे.

शासनाकडून बळीराजाला संरक्षण देण्याचे सोडून उपद्रवी प्राण्यांना मित्र बनविले जात आहे. यासाठी सरकारची (Government) उदासीनता कारणीभूत ठरत आहे. वांते, बिंबल गावातील लोकांना याचा मोठा त्रास होताना दिसत आहे. गवे बागायतीत, रस्त्यावर फिरताना दिसून येत आहेत, त्यामुळे लोकांना बागायतीत जाणे धोक्याचे बनले आहे.

वन खात्याने लोकांना संरक्षण देण्याकडे पाठ फिरविल्याने येथील लोकांचे जगणे खडतर झाले आहे. या कठीण परिस्थितीमुळे बागायतदारांचे शेतीतील अर्थकारण, व्यवस्थापन अत्यंत बिघडले असून यातून काय उपाय करावा या विवंचनेत आहेत. जंगलातील अन्न नष्ट झाल्याने वन्यप्राण्यांनी आपला मोर्चा लोकवस्तीत वळविला आहे. सत्तरीत याआधी शेतीबागायती चांगली चालायची. पण आजच्या घडीला जंगली प्राण्यांनी उत्पन्न फस्त करायचे व कष्टकरी लोकांनी केवळ बघ्याची भूमिका घ्यायची असेच चित्र दिसते आहे.

सब्सिडी काय फायद्याची!

वांते येथील बागायतदार भीमराव राणे यांनी सांगितले की, कृषी खात्याकडून केवळ सबसीडी घेऊन काय फायद्याची. उभे झालेले केळी पिकाचे उत्पन्न जमिनीवर आले आहे. खेती, माकडांनी केळी पिकाचे मोठे नुकसान केले आहे. हे चित्र पाहवत नाही. आजपर्यंत केलेल्या मेहनतीवर वन्यप्राण्यांकडून पाणी फेरले जात आहे. सरकार मात्र वन्यप्राण्यांच्या नियंत्रणासाठी कोणतीही उपाययोजना करीत नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: 'गॅस सिलिंडर'च्या वादातून जीवघेणा हल्ला; 3 आरोपींना पकडण्यासाठी गोवा पोलिसांचे राजस्थानात धाडसत्र

Viral Video: 'आता घरी चल, मग बघतेच...!' चालत्या बाईकवर बायकोची नवऱ्याला बुक्क्यांनी मारहाण; रोमँटिक गाण्यासह व्हिडिओ व्हायरल

कोवळ्या मुला – मुलींच्या तस्करीचा डाव उधळला; गोव्याकडे येणाऱ्या 13 जणांची वास्को – द – गामा ट्रेनमधून सुटका

Diwali Goa Trip: 10 हजारांच्या बजेटमध्ये गोवा दर्शन! दिवाळीत 'नरकासूर दहन' आणि समुद्रकिनाऱ्यांचा आनंद 3 रात्री/ 4 दिवसांत घ्या, अशी करा ट्रिप प्लॅन

Mayem Lake: पुन्हा उघडतोय मयेचा तलाव, आमदार प्रेमेंद्र शेट यांनी स्वतः केली पाहणी; नेमकी तारीख काय? वाचा 

SCROLL FOR NEXT