Rohan Khaunte
Rohan Khaunte Dainik Gomantak
गोवा

Goa Miles पेक्षा Goa Taxi App चे दर जास्त का? रोहन खंवटेंनी दिलं उत्तर

आदित्य जोशी

गोव्यात सध्या टॅक्सीभाड्याचा प्रश्न चांगलाच तापला आहे. मोपा विमानतळ सुरु झाल्यापासून तर गोवा टॅक्सी अॅपच्या माध्यमातून बुक केलेल्या टॅक्सीचं भाडं हे मुंबई-गोवा विमानभाड्यापेक्षा जास्त असल्याने सरकारवर टीकाही झाली होती. या सगळ्यात एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे गोवा टॅक्सी अॅपचे दर हे गोवा माईल्सपेक्षा तुलनेने खूप जास्त आहेत. आता यावर उत्तर देत पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी बाजू सावरण्याचा प्रयत्न केला आहे.

गोवा माईल्स ही कंपनी खासगी असल्याने तुलनेने त्यांच्या टॅक्सीचे दर कमी असल्याचं मंत्री रोहन खंवटेंचं म्हणणं आहे. गोवा माईल्स हे टॅक्सीच्या व्यावसायिक स्पर्धेत असल्यामुळे टिकून राहण्यासाठी त्यांनी प्रतिकिलोमीटर दर हे कमी ठेवलेले आहे. मात्र गोवा सरकारने लॉन्च केलेलं गोवा टॅक्सी अॅप मात्र कुणाशी स्पर्धा करत नसल्यामुळे तुलनेने त्याचे दर जास्त आहे.

मात्र जास्त दर असले तरीही चांगली सेवा देण्यासाठी गोवा टॅक्सी अॅप सज्ज आहे. तसंच गोवा टॅक्सी अॅप हे सरकारने ठरवून दिलेले दरच आकारत आहे. प्रवाशांवर कोणतीही सक्ती नाही. त्यांना परवडत असेल ती सेवा त्यांनी घ्यावी. गोवा माईल्स, गोवा टॅक्सी अॅप आणि कदंब असे पर्याय प्रवाशांसमोर आहेत, असं खंवटेंनी स्पष्ट केलं.

मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर फ्लाईटमधून उतरलेल्या एका प्रवाशाला मोपा ते बाणावली या टॅक्सी प्रवासासाठी तब्बल 4180 रूपये भाडे द्यावे लागले होते. त्यामुळे टॅक्सीचे हे भाडे हा आता चर्चेचा विषय झाला आहे. नेटीझन्सही यावरून टीका करत आहेत. जेवढे टॅक्सीभाडे या प्रवाशाला द्यावे लागले आहे तेवढ्यात विमान प्रवासाचे आणखी एक तिकीट खरेदी केले जाऊ शकते, अशी चर्चा सुरू आहे.

रोहन गोवेकर यांनी त्यांचे टॅक्सीच्या प्रवासी भाड्याची रिसीट सोशल मीडियात शेअर केली होती. टॅक्सी भाड्याची ही रिसीट सोशल मीडियात व्हायरल झाली. गोवेकर यांनी शेअर केलेल्या रिसीटमध्ये दिसते की मोपा ते बाणावली हे अंतर 65.86 किलोमीटर इतके आहे. यात टॅक्सीचे भाडे 3227.14 रूपये, सर्व्हिस फी 484.07 रूपये, एअरपोर्ट चार्जेस 160 रूपये आणि जीएसटी 161.36 आणि 115.93 रूपये असे मिळून 4148.50 रूपये बिल आले होते. त्यावर नेटीझन्सकडून विमान तिकीटाचे दर जास्त की टॅक्सीभाडे जास्त असा सवाल केला जात आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sanguem Temple Theft: गोव्यातील मंदिरे असुरक्षित! सांगेत विठ्ठल मंदिरातील 5 किलो चांदीची 4 लाखांची प्रभावळ लंपास

Afghanistan Floods: अफगाणिस्तानात विनाशकारी पुरात 300 हून अधिक लोकांचा मृत्यू; बागलान प्रांताला सर्वाधिक फटका!

मसाल्यातील केमिकल वादावर बोर्डाचे मोठे पाऊल; निर्यातदारांसाठी नवीन गाइडलाइन जारी

Goa News: पल्‍लवी धेंपे आणि अँथनी बार्बोझा यांची बदनामी; संशयिताला प्रतिबंधात्‍मक अटक

POK मध्ये पाकिस्तान सरकारविरोधात ‘काश्मीरी जनता’ रस्त्यावर, पाक रेंजर्सची दडपशाही; व्हिडिओ व्हायरल!

SCROLL FOR NEXT