Sanjay Raut Dainik Gomantak
गोवा

Sanjay Raut: कोरोना वाढत असताना केजरीवालांना गोव्यात जायची काय गरज?

अरविंद केजरीवाल यांनी गोव्यात घरोघरी प्रचार केला. त्यावर संजय राऊत यांनी खरमरीत टीका केली आहे.

दैनिक गोमन्तक

Sanjay Raut: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी आपल्या निवडणूक प्रचाराला (Election Campaign) जोरदार सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) शनिवारी गोव्यात दाखल झाले होते. त्यांनी गोव्यातील जनतेशी संवाद साधला. मात्र त्यांच्या या प्रचारवर शिवसेचे खासदार संजय राऊत यांनी टीका करत केजरीवालांवर निशाणा साधला आहे.

अरविंद केजरीवाल यांनी शिरोडा आणि सांतआंद्रे मतदारसंघात डोअर-टू-डोअर प्रचार करत येथील नागरिकांची घरोघरी जाऊन भेट घेतली. या मतदारसंघातील नागरिकांनी त्यांचे मन:पूर्वक स्वागत केले. यावेळी त्यांनी जनतेशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. आणि जर गोव्यात विधानसभा निवडणुकीत (Goa Assembly Elections 2022) आपचे सरकार निवडून आले तर ह्या सर्व समस्यांचे निराकरण करण्याचे आश्वासनही दिले.

त्यांच्या या निवडणूक प्रचारावर संजय राऊतांनी (Sanjay Raut) मात्र तोंडसुख घेतले. ते म्हणाले की, 'दिल्लीत कोरोनाची प्रकरणे वाढत आहेत. शिवाय गोव्यातही कोरोना रुग्णसंख्या असतानाही दिल्लीचे मुख्यमंत्री गोव्यात घरोघरी प्रचार करत आहेत. या सगळ्याची काय गरज आहे? ते फक्त त्यांचा संदेश देऊ शकतात. परिस्थिती पाहता त्यांनी प्रत्यक्षपणे प्रचार करण्याची काहीच गरज नव्हती.' आता यावर केजरीवाल राऊतांना काय प्रत्युत्तर देणार ही पाहणे महत्वाचे ठरेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT