'गोवा' अव्वल स्थानी! भारतीयांचे आवडते पर्यटन स्थळ

भारतीय आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळांऐवजी देशांतर्गत पर्यटनस्थळांवर जाण्यास प्राधान्य देण्यात येत आहे. यापैकी गोवा हे भारतीय प्रवाशांचे सर्वाधिक पसंतीचे पर्यटन स्थळ बनले आहे.
Goa is a favorite tourist destination of Indians
Goa is a favorite tourist destination of IndiansDainik Gomantak
Published on
Updated on

यावर्षी भारतीय आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळांऐवजी देशांतर्गत पर्यटनस्थळांवर जाण्यास प्राधान्य देण्यात येत आहे. यापैकी गोवा हे भारतीय प्रवाशांचे सर्वाधिक पसंतीचे (Goa is a favorite tourist destination of Indians) पर्यटन स्थळ बनले आहे. ओयो ट्रॅव्हलोपीडियाच्या सर्वेक्षणात ही वस्तुस्थिती समोर आली आहे. सर्वेक्षणानुसार गोव्यानंतर मनाली हे भारतीयांचे (India) दुसरे आवडते ठिकाण आहे. सर्वेक्षणात 61 टक्के भारतीयांनी सांगितले की, त्यांना देशांतर्गत ठिकाणी सुट्टीवर (Tourism) जायला आवडेल.

Goa is a favorite tourist destination of Indians
Republic Day Parade: प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीत वाहतूक सूचना जारी

त्याच वेळी, 25 टक्के लोकांनी सांगितले की त्यांना देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळांना जायला आवडेल. भारतीय सहलीबद्दल रोमांचित असले तरी, साथीच्या आजारादरम्यान सुरक्षितता ही त्यांची सर्वात मोठी चिंता आहे. 80 टक्के लोकांनी सांगितले की सुरक्षा ही त्यांच्यासाठी चिंतेची बाब आहे. यासोबतच, लसीचा बूस्टर डोस प्रवासाच्या अपेक्षा सुधारेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आवडत्या पर्यटन स्थळांच्या बाबतीत गोवा (Goa) देशात पहिल्या क्रमांकावर आहे. एक तृतीयांश लोकांनी गोव्याला जायचे असल्याचे सांगितले आहे. त्यानंतर अनुक्रमे मनाली, दुबई, शिमला आणि केरळचा क्रमांक लागतो. ओयो म्हणाले की जेव्हा आंतरराष्ट्रीय स्थळांचा विचार केला जातो तेव्हा भारतीयांना मालदीव, पॅरिस, बाली आणि स्वित्झर्लंडला जायला लोकांची पसंती आहे.

Goa is a favorite tourist destination of Indians
भारतात कोरोना लसीकरणाला एक वर्ष पूर्ण, जाणून घ्या जगाच्या तुलनेत देश कुठे आहे?

सर्वेक्षणात सहभागी झालेल्या 37 टक्के लोकांनी सांगितले की, त्यांना त्यांच्या जोडीदारासोबत सहलीला जायला आवडेल. 19 टक्के लोकांनी सांगितले की त्यांना त्यांच्या मित्रांसोबत सुट्टी घालवायला आवडेते. त्याचवेळी 12 टक्के लोकांनी एकट्याने प्रवास करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com