Luizinho Faleiro Dainik Gomantak
गोवा

2017 साली दिग्विजय सिंहांचा घोळ गोवा काँग्रेसच्या अंगलट आला होता

लुईझिन फालेरो यांच्या कार्यकर्त्यांचा विरोधीपक्षनेते दिगंबर कामत यांच्यावर आरोप

दैनिक गोमन्तक

मडगाव: काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी आम्हाला लुईझिन फालेरो यांना मतदान न करता अपक्ष उमेदवाराला मतदान करा असे सांगितले होते. याची आम्ही चेल्लाकुमार यांच्याकडे तक्रारही केली होती, पण त्यावेळी तुमच्याकडे याचा व्हिडिओ आहे का असे विचारून आम्हाला गप्प केले होते, असा आरोप अब्दुल सत्तार यांनी लुईझिन फालेरो यांच्या निवासस्थानी झालेल्या तृणमूलच्या सभेत केला.

यावेळीही दिगंबर कामत यांचे समर्थक असलेले इब्राहिम मुल्ला हे मशिदीच्या पदाधिकाऱ्यांना आम्ही लुईझिन फालेरो यांना पुन्हा दिल्लीत पाठवून दिगंबर कामत यांना मुख्यमंत्री बनवायचे ठरविले आहे. कोणत्याही प्रकारे फालेरो यांना पाडायचे आहे असे सांगितले होते. यासाठी आपण केंद्रीय निरीक्षक दिनेश राव यांच्या घरी जाऊन बोललो आहे असे सांगितले असा घणाघाती आरोपही त्यांनी केला.

यानंतर कामत यांचे नाव न घेता लुईझिन फालेरो यांनी काँग्रेस नेत्यांवर तोंडसुख घेताना, गोव्यातील काही काँग्रेस नेते भाजपची दलाली करण्यात धन्यता मानतात असा आरोप करून इब्राहिम ज्याला गोव्यात फॉर्मलीन माफिया म्हणून ओळखले जाते तोच गोव्यात राव यांची बडदास्त ठेवत होता. त्यांच्यासाठी गाडी इब्राहिमची असायची आणि त्यांच्या हॉटेलचा खर्चही इब्राहिम करायचा असा आरोप केला. राव आपल्याला भेटायला घरी आले होते. त्यावेळी आपण त्यांना इब्राहीम तुमच्या घरी आले होते का असे विचारले असता त्यांनी होकार दिला, असे फालेरो म्हणाले.

‘...म्हणून काँग्रेस सत्तेपासून दूर’

1999 साली मी गोव्यात पूर्ण क्षमतेचे काँग्रेस सरकार सत्तेवर आणले, पण काही अशा प्रवृत्तींच्या लोकांनी 10 आमदार फोडले आणि त्यामुळेच भाजपला गोव्यात सत्तेवर येण्याचा मार्ग मोकळा झाला, असे लुईझिन फालेरो म्हणाले. 2017 मध्येही अशाच नेत्यांमुळे काँग्रेस गोव्यात सत्तेवर येऊ शकली नाही. माझ्याकडे 11 आमदार असतानाही दिग्विजय सिंह आणि वेणूगोपाल यांनी मला सत्ता स्थापनेचे पत्र देण्यापासून रोखले. एव्हढेच नव्हे, तर त्याच रात्री विजय सरदेसाई यांच्या घरी जाऊन आम्ही सांगितल्याशिवाय काँग्रेसला पाठिंबा देऊ नका असे सांगितले. 2017 साली काँग्रेस सत्ता स्थापन करू शकली नाही, त्यामागे अशी कारस्थाने होती, असा आरोप त्यांनी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'माझ्या दारात संकट नाही, तर मला काय देणे-घेणे?' शतकापूर्वी सावरकरांनी कोरडे ओढलेली संकुचित मानसिकता आजही उभी

Budh Nakshatra Parivartan 2026: 8 ऑगस्टपासून 'या' राशींचे नशीब उजळणार; बुधाच्या नक्षत्र बदलाने यशाचे नवे मार्ग खुलणार

Under Secretary Recruitment: अवर सचिव भरतीला कोर्टाचा 'ब्रेक'; राज्य सरकारला दणका; 2 महिला अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा फेरविचार करण्‍याचा आदेश

36 Villages Without 4G 5G In Goa: हायस्पीड इंटरनेटपासून 36 गावे अद्याप दूर; खासदार तानावडेंच्‍या प्रश्‍‍नाला केंद्रीय संपर्क राज्‍यमंत्र्यांचे उत्तर

PM Surya Ghar Yojana: 'पीएम सूर्यघर' योजनेअंतर्गत 3,323 घरांवर 'सोलर पॅनेल'; केंद्र सरकारकडून मिळाली 22.58 कोटींची सबसिडी

SCROLL FOR NEXT