Goa Liquor Revenue Dainik Gomantak
गोवा

Goa Liquor Revenue: एक, दोन नव्हे महसुलात तब्बल 6 पट वाढ; मद्यविक्रीतून गोवा मालामाल...

गोव्यात गतवर्षीच्या महसूल 650 कोटी रूपयांवर

Akshay Nirmale

Goa Liquor Revenue: देशातील इतर राज्यांच्या तुलने गोव्यात मद्यावरील करांमध्ये सुट असल्याने येथे मद्याच्या किंमती कमी असतात. त्यामुळे देशभरातील मद्यप्रेमी पर्यटकही गोव्यात पर्यटनासाठी येतात, तेव्हा त्यातून ते येथे स्वस्तःत उपलब्ध होणाऱ्या मद्याचेही सेवन करत असतात. त्यातून पर्यटन हंगामात गोव्याला मोठा महसूलही मिळत असतो.

ताज्या माहितीनुसार, गोव्यात गतवर्षात मद्यविक्री महसुलात तब्बल 135 कोटी रूपयांची वाढ झाल्याची माहिती आहे. ही वाढ त्या आधीच्या वर्षीच्या वाढीच्या (23 कोटी) तुलनेत 6 पट इतकी जास्त आहे.

सन 2019-20 मध्ये मद्यविक्रीतून गोव्याला 491.84 कोटींचा महसूल मिळाला होता. सन 2020-21 मध्ये त्यामध्ये 23 कोटींची वाढ होऊन हा महसूल 514.91 कोटींवर गेला. तर गतवर्षी 2021-22 मध्ये या महसुलात 135 कोटी रूपयांची वाढ होऊन एकूण महसूल 649.91 कोटी रूपयांवर गेल्याचे समजते.

2019-20 मध्ये कोविड काळामुळे या काळात राज्यातील पर्यटकांच्या संख्येवर मोठा परिणाम झाला होता. त्यामुळे या काळात मद्यविक्रीतील महसूल घटला होता. एकुणच या महसुलवाढीमुळे राज्याच्या तिजोरीत भरघोस भर पडली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT