Vijai Sardesai Dainik Gomantak
गोवा

Vijay Sardesai: पार्किंग इमारतीतील रेस्टॉरंटचा प्रस्ताव कोणाचा?

दैनिक गोमन्तक

Vijay Sardesai: विद्यमान तसेच माजी नगराध्यक्षांना मडगाव पालिका इमारतीमागील प्रस्तावित पार्किंग इमारतीत रेस्टॉरंट प्रस्तावाची माहितीच नाही. तसे त्यांनी बोलूनही दाखवले आहे. आमच्या पक्षाचे नगरसेवक जेव्हा पालिकेत सत्तेवर होते,

तेव्हा त्यांनीही कधी रेस्टॉरंटचा प्रस्ताव पाठवलेला नव्हता किंवा त्याचा विचारही केला नव्हता. मग हा प्रस्ताव नेमका कोणाचा? मडगावचे आमदार दिगंबर कामत हे रेस्टॉरंट हवे, असा हट्ट का धरून आहेत, याची चौकशी व्हावी, अशी मागणी फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांनी मडगावात पत्रकारांशी बोलताना केली.

एक तर मडगावचे आमदार खोटे बोलत असावेत किंवा त्यामागे त्यांचा काहीतरी स्वार्थ असावा. मडगावात अनेक उड्डाण पुलांचे प्रस्ताव पुढे येत आहेत, ते कशासाठी?

एक बगल रस्ता बंद करून कोणाच्या तरी स्वार्थासाठी हे उड्डाण पुलाचे प्रस्ताव आहेत. की कामत मुख्यमंत्री असतानाही मडगावचा विकास झाला नाही आणि आताही मडगाववासीयांना मूलभूत सुविधा मिळत नाही, अशी टीका सरदेसाई यांनी केली.

कचऱ्याचा प्रश्र्न तर दिवसेंदिवस गंभीर होत आहे. केवळ पाहणी करून काहीही साध्य होणार नाही. कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी दूरदर्शी योजना आवश्यक आहे.

ही जबाबदारी जे पालिका चालवतात, त्यांची असून परत एकदा कोणीतरी त्यासाठी उच्च न्यायालयात जावे, असा त्यांना वाटते का, असा प्रश्र्नही सरदेसाई यांनी उपस्थित केला.

परवानाही कालबाह्य

याबाबत माजी नगराध्यक्ष आर्थूर सिल्वा यांना विचारले असता ते म्हणाले, मी नगराध्यक्ष असताना पार्किंग इमारतीचा प्रस्ताव मंजूर करून पायाभरणीही केली होती. त्यासाठी तीन कोटींची तरतूदही केली होती. मडगावात पार्किंगची समस्या दिवसेंदिवस डोईजड होत आहे. पालिकेला महसुलामध्ये वाढ व्हावी, असे वाटत असेल तर रेस्टॉरंटची गरज काय? इतर अनेक पर्याय त्यासाठी उपलब्ध आहेत. त्यावेळी एसजीपीडीएला २९.३० लाख रुपयांची लायसन्स फीसुद्धा भरली होती. आता हा परवाना कालबाह्य झाला असेल, सिल्वा म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ponda: बहिणीने धाडस केले पण भाऊ बचावला नाही; 17 तासानंतर आढळला दर्शन नार्वेकरचा मृतदेह

मेरशीत एक महिन्यापासून उभ्या जीपमध्ये आढळला मृतदेह, परिसरात खळबळ; गोव्यातील ठळक बातम्या

Goa Belgaum Highway: गोवा-बेळगाव महामार्गावरील वाहतूक ठप्प, दोन्ही बाजूला 4-5 किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा

Divar Island: पाचव्या शतकातील निर्मिती प्रक्रिया वापरुन गोव्यात उभारलं जातंय जहाज; पुढल्या वर्षी करणार गुजरात ते मस्कत प्रवास

Funny Viral Video: 3 वर्षापासून पैसे साठवून 4 मित्र गोव्याला निघाले, टोल भरण्यातच खिसे रिकामे झाले

SCROLL FOR NEXT