Goa DIG Suspended: गोव्यातील बागा-कळंगुट येथील नाईट क्लबमध्ये महिलेसोबत गैरवर्तन केल्याप्रकरणी IPS अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे.
गृह मंत्रालयाने बुधवारी (दि.16) कारवाईचे आदेश जारी केल्यानंतर गोव्याचे DIG ए कोन यांना निलंबित करण्यात आले. गृह मंत्रालयाचे अवर सचिव राकेश कुमार सिंह यांनी हा आदेश जारी केला आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
IPS अधिकारी कोन 7 ऑगस्ट रात्रीच्या वेळी गोव्यातील एका नाईट क्लबमध्ये गेले होते. तेथे त्याचा एका महिलेशी वाद झाला. कोन यांनी मद्यसेवन देखील केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. याचेवळी त्यांनी महिलेसोबत गैरवर्तन केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
यादरम्यान महिलेने डीआयजी ए कोन यांना थोडाबाडीत मारली. यानंतर क्लबमध्ये एकच गोंधळ उडाला. याकाळात आयपीएस अधिकारी वैद्यकीय रजेवर असल्याचेही सांगण्यात येत आहे.
IPS अधिकारी 'कोन' कोण आहेत?
DIG ए कोन हे 2009 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. AGMUT हा त्यांचा केडर आहे. म्हणजेच अरुणाचल प्रदेश, गोवा, मिझोराम आणि केंद्रशासित प्रदेश या राज्यांसाठीचा हा केडर आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत (UPSC) कोन यांनी भारतात 322 वा क्रमांक मिळवला होता. कोन मूळचे तामिळनाडू येथील रहिवासी आहेत. गोव्यात डीआयजी पदावर ते कार्यरत होते.
कोन यांची फेब्रुवारी 2023 मध्ये गोव्यात बदली झाली. याआधी कोन दिल्ली पोलिसांच्या वाहतूक विभागात डीसीपीही राहिले आहेत.
कळंगुट येथील हा क्लब गोव्यातील एका प्रख्यात राजकारण्याच्या जवळच्या व्यक्तीचा आहे. अशीही माहिती समोर आली. राज्यात सर्वत्र या घटनेची जोरदार चर्चा झाली. याच काळात सुरू असलेल्या विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात आमदार विजय सरदेसाई यांनी हा प्रश्न उपस्थित केला. त्यानंतर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आयपीएस अधिकाऱ्यावर कठोर कारवाईचे आश्वासन दिले होते. अशा घटना आम्ही खपवून घेणार नाही, असेही सावंत म्हणाले.
कोन यांचा महिलेसोबत गैरवर्तन करतानाचा सीसीटीव्ही व्हिडिओही समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही महिला दिल्लीची रहिवासी असून, ती गोव्याला भेट देण्यासाठी गेली होती.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.