Pravin Zantye and Premendra Shet in Mayem Constituency Dainik Gomantak
गोवा

मयेत 'मत विभागणी'चा लाभ कुणाला?

भाजपचा 'गड' शाबूत राहणार, मगोची 'सिंहगर्जना' होणार, की...

दैनिक गोमन्तक

डिचोली : जमीन मालकी हक्क, बेरोजगारी आणि खाण प्रश्न हे प्रमुख मुद्दे असले, तरी मये मतदारसंघात यावेळी मत विभागणी निर्णायक ठरणार आहे. तशी चर्चाही सध्या चालू आहे. मये मतदारसंघातील मतदानाची टक्केवारी पाहता, यावेळी मयेत कोण बाजी मारणार, त्याबद्दल कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे.

भाजपचा 'गड' शाबूत राहणार, मगोची 'सिंहगर्जना' होणार, की गोवा फॉरवर्ड (Goa Forward) पुढे येणार, याकडे आता मतदारांचे लक्ष लागून राहिले आहे. एकंदरीत मतदारसंघाचा कानोसा घेतला असता, यावेळी मत विभागणी आणि मतदानपूर्व रात्री झालेला "अर्थ" पूर्ण प्रचार निर्णायक ठरणार आहे. 'आप' आणि अपक्ष उमेदवारांनी कोणाची मते फोडलीत , त्यावरच निकाल ठरणार आहे. सलग तीन मिळून चारवेळा मयेत भाजपचे 'कमळ' फुलले आहे. त्यामुळे हा मतदारसंघ भाजपसाठी 'सुरक्षित' मतदारसंघ असला, तरी या निवडणुकीत मत विभागणीचा मोठा फटका भाजपला बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

भाजपचे माजी आमदार (MLA) आणि मगोचे उमेदवार प्रवीण झांट्ये यांच्यासह गोवा फॉरवर्डचे संतोषकुमार सावंत यांनाही मतविभागणीचा काहीसा फटका बसण्याची शक्यता आहे. या परिस्थितीतून कोण सावरणार आणि मतदारांचा कौल कोणासाठी फायद्याचा ठरणार,हे 10 मार्च रोजी स्पष्ट होणार आहे. या निवडणुकीपूर्वी मये (Mayem) मतदारसंघासाठी झालेल्या सात विधानसभा निवडणुकीत सुरवातीच्या सलग दोन निवडणुकांत (Election) मगोची सरशी झाली आहे. तर काँग्रेसला (Congress) मतदारांनी एकदाच 'हात' दिला आहे.

84.33 टक्के मतदान

मये मतदारसंघात यावेळी 84.33 टक्के एवढे मतदान झाले आहे. एकूण 28,909 पैकी 24382 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यात महिला मतदारांची संख्या लक्षणीय आहे. 14,143 पुरुष मतदारांपैकी 11,839 जणांनी, तर 14,766 महिला मतदारांपैकी 12,543 महिलांनी मतदानाचा हक्क बजावला.

उमेदवारांकडून विजयाचे दावे !

भाजपचे (BJP) प्रेमेंद्र शेट यांच्यासह मगोचे प्रवीण झांट्ये, काँग्रेस-गोवा फॉरवर्ड युतीचे संतोषकुमार सावंत या प्रमुख उमेदवारांनी विजय आपलाच असल्याचा दावा केला आहे. तर 'आप' चे (AAP) राजेश कळंगुटकर चमत्कार करणार, असा दावा आप कार्यकर्ते करीत आहेत. सध्या मतदारसंघात चर्चेचे फड रंगू लागले आहेत. समर्थक कार्यकर्ते आपापल्या पसंतीचा उमेदवार कसा निवडून येणार, त्याबद्दल इतरांना पटवून देत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: ज्येष्ठ कोंकणी साहित्यिक मीना काकोडकर यांचे निधन!

Goa News: गोव्यात भूरूपांतरासाठी अनेक प्रस्ताव! 1 लाख 18 हजार 756 चौरस मीटर जमीनीवर लक्ष; 'नगर नियोजन'ने मागवले आक्षेप

Sattari Crime: वाळपईतील व्यावसायिकाला 'स्टॉक एक्स्चेंज'च्या व्याजाचे आमिष दाखवून एक कोटींचा गंडा! बंगळूरू येथील संशयितास अटक

Goa Drugs Case: गोव्यात डीजे रशियन महिलेकडे सापडले 17 लाखांचे अंमलीपदार्थ! छाप्यात मिळाले नव्या प्रकारचे ड्रग्ज

Zuari Accident: दुर्दैवी! नवीन झुआरी पुलावर झालेल्या दुचाकींच्या अपघातात एकाचा मृत्यू; अतिवेगाने गाडी चालवल्याबद्दल चालकास अटक

SCROLL FOR NEXT