ओडिशा, चेन्नईयीनला बरोबरीचे समाधान

दोन वेळच्या माजी विजेत्या चेन्नईयीनची ही 17 लढतीतील पाचवी बरोबरी ठरली
Equal satisfaction for Odisha, Chennai
Equal satisfaction for Odisha, Chennai Dainik Gomantak

पणजी ः ओडिशा एफसी व चेन्नईयीन एफसीने एकमेकांवर कुरघोडी करताना विजयासाठी आटोकाट प्रयत्न केले, पण आठव्या इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल लढतीत त्यांना अखेर बरोबरीचेच समाधान लाभले, त्यामुळे प्ले-ऑफ फेरीच्या दृष्टीने दोन महत्त्वपूर्ण गुणांनाही मुकावे लागले.

वास्को (Vasco) येथील टिळक मैदानावर बुधवारी झालेला सामना 2-2 गोल बरोबरीत राहिला. रहीम अली याने दुसऱ्याच मिनिटास चेन्नईयीन एफसीला आघाडी मिळवून दिल्यानंतर 18व्या मिनिटास स्पॅनिश हावी हर्नांडेझ याने ओडिशाला बरोबरी साधून दिली. हावीचा यंदाच्या स्पर्धेतील सहावा गोल ठरला. नंतर 51व्या मिनिटास ब्राझीलियन आघाडीपटू जोनाथस ख्रिस्तियन याच्या मोसमातील वैयक्तिक आठव्या गोलमुळे ओडिशाला आघाडी मिळाली. चेन्नईयीनशी करारबद्ध झाल्यानंतर लिथुआनियाच्या नेरियूस व्हाल्सकिस याने पहिलाच गोल केल्यामुळे पुन्हा बरोबरी झाली. 

Equal satisfaction for Odisha, Chennai
भाजपकडून आढावा; नेते, उमेदवारांकडून मतदानाच्या कामगिरीचे मूल्यांकन

त्याने रहीम अलीच्या असिस्टवर 69व्या मिनिटास गोल केला. व्हाल्सकिसचा हा आयएसएलमधील एकंदरीत 26वा गोल ठरला. मात्र नंतर व्हाल्सकिसने सोपी संधी दवडल्यामुळे चेन्नईचा संघ आघाडीपासून दूर राहिला.

एफसी गोवाविरुद्ध (FC-Goa) 5-0 फरकाने हार पत्करल्यानंतर बोझिदार बँडोविच यांनी चेन्नईयीनचे प्रशिक्षकपद सोडले. त्यानंतर सय्यद साबीर पाशा यांच्या मार्गदर्शनाखालील चेन्नईयीनचा हा पहिलाच सामना होता. दोन वेळच्या माजी विजेत्या चेन्नईयीनची (Chennai) ही 17 लढतीतील पाचवी बरोबरी ठरली. त्यांचे आता 20 गुण आणि आठवा क्रमांक कायम राहिला. ओडिशाच्या गुणतक्त्यातील क्रमांकातही फरक पडला नाही. 22 गुणांसह ते सातव्या क्रमांकावर राहिले. त्यांची 17 लढतीतील चौथी बरोबरी होती.

Equal satisfaction for Odisha, Chennai
'म्हणून' झालं मोठ्या प्रमाणावर मतदान? हे बदलासाठी झालेलं नाही तर..

चेन्नईयीनने पहिल्या टप्प्यात ओडिशाला 2-1 फरकाने हरविले होते, पण त्यांना बुधवारी मागील कामगिरीची पुनरावृत्ती करता आली नाही. सामन्यात त्यांनी सेटपिसेसवर आघाडी घेतली. नेरियूस व्हाल्सकिस याचा फ्रीकिक फटका प्रतिस्पर्धी खेळाडूंच्या भिंतीला आपटल्यानंतर रहीम अलीने रिबाऊंडवर अचूक नेम साधला. नंतर जोनाथस ख्रिस्तियन याच्यासोबत साधलेल्या सुरेख समन्वयानंतर हावी हर्नांडेझने चेन्नईयीनचा गोलरक्षक देबजित मजुमदार याची झेप फोल ठरविली. विश्रांतीनंतर सुरवातीला संधी गमावलेल्या जोनाथस ख्रिस्तियनने चेन्नईयीनच्या कमजोर बचावाचा लाभ उठविला. नंतर रहीम अलीने दिलेल्या पासवर व्हाल्सकिसचे हेडिंग भेदक ठरले आणि चेन्नईयीनला पिछाडी भरून काढण्याचे समाधान लाभले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com