While inaugurating the South Goa District Oxygen Generating System, Chief Minister Dr. Along with Pramod Sawant, other ministers and dignitaries Dainik Gomantak
गोवा

Goa: चतुर्थी साजरी करताना काळजी घ्या मुख्यमंत्री डॉ. सावंत यांचे आवाहन

द. गोवा (S. Goa) जिल्हा इस्पितळात ऑक्सिजन निर्माण यंत्रसंच कार्यान्वित

Dainik Gomantak

फातोर्डा (प्रतिनिधी): गोव्यात गणेश चतुर्थी (Ganesh Chaturthi) उत्साहाने व मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. यंदाही गोमंतकीयांनी चतुर्थी साजरी करावी पण त्याच बरोबर स्वतःची सर्वतोपरी काळजी घ्यावी. त्यामुळे कोविडची संभावित तिसऱ्या लाटेचा (Covide - 19 3rd wave) विपरीत परिणाम होणार नाही, अशी विनंती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली आहे. दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात गोवा शिपयार्ड लिमिटेड कंपनीच्या (Goa Shipyard Ltd. Co.) सहकार्याने उभारलेल्या ऑक्सिजन निर्माण यंत्रसंच (Oxygen generating machinery) हस्तांतरीत व कार्यान्वित केल्या प्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते.(CM Dr Pramod Sawant)

राज्य सरकारने कोविडच्या संभावीत  तिसऱ्या लाटेला सामोरे जाण्यासाठी सर्व प्रकारची तयारी केली असुन साधनसुविधा निर्माण केल्या आहेत व मनुष्यबळ वाढवून प्रशिक्षीत केल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. आरोग्य व आयटी गटांतर्फे कोविडच्या स्थितीची नियमित आढावा घेतला जातो व त्याप्रमाणे निर्णय घेतले जातात. चतुर्थीच्या दिवसात लक्षणे दिसल्यास त्वरीत वैद्यकीय तपासणी करुन घ्यावी शिवाय गोव्याच्या सीमांवरही सरकारने कडक नजर ठेवली आहे असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

गोव्यात 100 टक्के कोरोनाच्या पहिल्या डोसाचे लसिकरण झाले असुन 31 ऑक्टोबर पर्यंत दुसऱ्या डोसाचेही लसिकरण 100 टक्के होण्याकडे सरकारचे उद्दीष्ट आहे. गोव्यात जवळ जवळ 20 टक्के लोकांनी दुसरी लस घेतली नसल्याचे निदर्शनास आले आहे. ज्यानी दुसरा डोस घेतलेला नाही त्यानी त्वरीत घ्यावा असे आवाहनही त्यानी या प्रसंगी केले. 

गोव्यात कोविड लसीची मुळीच कमतरता नाही, वरुन भरपुर लसी उपलब्ध आहेत. केवळ प्रत्येकाने लसिकरणाची जागृती करावी असेही मुख्यमंत्री म्हणाले. त्यानी या प्रसंगी गोवा शिपयार्ड आरोग्य, शैक्षणिक व इतर क्षेत्रांमध्ये सहकार्याचे, मदतीचे योगदान देत आहे त्याची प्रशंसा केली. कोविड काळात  वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तिंनी केलेल्या भरीव कामसाठी  बंदर, शिपिंग व पर्यंटन केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यानी शाबासकी दिली. सर्व देशबांधवानी कठीण काळात एकमेकांना सहकार्य करावे व एकजुट दाखवावी असे आवाहनही त्यानी केले.

ऑक्सिजन निर्माण यंत्रसामग्री बरोबरच दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात सर्व सुविधा आता उपलब्ध झाल्या आहेत. गोव्यात शिस्तबद्ध पद्धतीने लसिकरण झाल्याने व सरकारने योग्य पाऊले उचलल्याने कुठल्याही प्रसंगाला तोंड द्यायला सरकार पुर्ण सक्षम झाल्याचे आरोग्यमंत्री विश्र्वजीत राणे यांनी सांगितले.

गोवा  शिपयार्ड लिमिटेड कंपनीचे चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक कर्नल बी बी नागपाल यानी सांगितले की दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात ऑक्सिजन निर्माण करण्याचा जो प्रकल्प सुरु करण्यात आला त्याला अंदाजे 1 कोटी 3 लाख रुपये खर्च झाला. या यंत्रसंचाद्वारे मिनिटाला 960 लिटर ऑक्सिजन तयार करण्याची क्षमता आहे. गोवा शिपयार्ड कंपनी आपली सामाजिक बांधिलकी कधीही विसरणार नाही. भविष्यात कंपनीद्वारे आरोग्य, शैक्षणिक, कचरा व्यवस्थापन, कौशल्य विकास क्षेत्रांमध्ये  सदैव मदतीचा हात पुढे करेल असे आश्वासन त्यांनी दिले. आरोग्य खात्याचे संचालक डॉ. ज्योस देसा यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

T20 World Cup 2026: 'चोकर्स'चा शिक्का पुसण्याची संधी? "यंदा हिशोब चुकता होणार!", माजी कर्णधाराने दिले भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका हायव्होल्टेज फायनलचे संकेत

Viral Video: डिलिव्हरीच्या घाईत मृत्यूला दिली हुलकावणी! स्विगी बॉयचा काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ व्हायरल; माणुसकी विसरल्याच्या चर्चेनं सोशल मीडिया तापलं

'बर्च बाय रोमियो लेन'चा मॅनेजर झारखंडमधून अटकेत; गोवा पोलिसांची मोठी कारवाई

पर्वरी – चोडणला जोडणाऱ्या पुलासाठी 275 कोटींची निविदा; काम वेळेत पूर्ण न झाल्यास दिवसाला 13.74 लाख द्यावी लागणार नुकसान भरपाई

"इतिहासाचा बदला घ्यावाच लागेल...!"; अजित डोवाल यांनी शत्रूंना सुनावले खडे बोल; भारतीय तरुणांना दिला धगधगत्या क्रांतीचा मंत्र VIDEO

SCROLL FOR NEXT