Churchill Alemao Dainik Gomantak
गोवा

चर्चिल यांचा 'सस्पेन्स' कायम, दोन आठवड्यासाठी 'व्हेट अँड व्हॉच'

राष्ट्रवादीचे बाणावलीचे आमदार चर्चिल आलेमाव (Churchill Alemao) तृणमुल पक्षात (Trinamool party) जाणार की नाहीत याबद्दलचे सस्पेन्स अजून कायम आहे.

दैनिक गोमन्तक

मडगाव: राष्ट्रवादीचे बाणावलीचे आमदार चर्चिल आलेमाव (Churchill Alemao) तृणमुल पक्षात (Trinamool party) जाणार की नाहीत याबद्दलचे सस्पेन्स अजून कायम असून आपण कोणत्या पक्षात सामील होणार याची घोषणा दोन आठवड्यांनी जाहीर करेन असे त्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले.

काँग्रेस (Congress) आणि भाजपा (BJP) हे दोघेही बाहेरून जरी वेगळे असे दाखवित असले तरी आतून एकच आहेत त्यामुळे काँग्रेस पक्षा बरोबर आपल्याला कुठल्याही परिस्थितीत युती करायची नाही. ज्या पक्षाकडे भाजपला शिंगावर घेण्याची धमक आहे त्याच पक्षात आपण सामील होणार असे त्यांनी सांगितले. ही धमक फक्त ममता बॅनर्जी आणि शरद पवार यांच्यातच आहे असेही त्यांनी पुढे सांगितले.

चर्चिल आलेमाव व त्यांची कन्या वालांका यांनी दोन दिवसांपूर्वी कोलकोत्त्याला जाऊन तृणमुलच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांची भेट घेतली होती. त्यानंतर चर्चिल तृणमुलमध्ये जाणार असे वृत्त सगळीकडे पसरले होते. मात्र ती सदिच्छा भेट होती असे त्यांनी आज सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT