Goa Court Dainik Gomantak
गोवा

Goa Court: परवाना रद्द केल्याचे प्रकरणं दाखवा

हणजूण किनारपट्टी भागात ध्वनिप्रदूषण होईल अशाप्रकारे रात्री उशिरा संगीत पार्ट्या आयोजित करण्यात आल्या होत्या.

दैनिक गोमन्तक

पणजी: किनारपट्टी (Beach) परिसरात पोलिसांकडून (Police) ध्वनिप्रदूषणप्रकरणी (Noise pollution) एखाद्याकडून तक्रारी आल्यानंतरच दखल घेऊन त्याची कारवाई केली जाते. पोलिस स्वतःहून यासंदर्भात परिसरात गस्त घालून कारवाई का करत नाही. ध्वनिप्रदूषणप्रकरणी पोलिसांनी कारवाई करून परवाना रद्द केल्याचे एक प्रकरण तर दाखवा असा प्रश्‍न मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने (Goa Bench of Mumbai High Court) आज सुनावणीवेळी सरकारी वकिलांना केला.

सागरदीप शिरसईकर यांनी सादर केलेल्या याचिकेवरील मागील सुनावणीवेळी हणजूण येथे किनारपट्टी भागात हल्ली काही दिवसांपूर्वी ध्वनिप्रदूषण होईल अशाप्रकारे रात्री उशिरा संगीत पार्ट्या आयोजित करण्यात आल्या होत्या. त्याचे व्हिडिओही गोवा खंडपीठात सादर केले गेले होते. त्याची प्रत प्रतिवादी असलेल्या वागातोर - हणजूण येथील लॅरिव्ह बीच शॅकचे प्रोप्रायटर इलाईनो परेरा यांनाही देण्यात आले होते व त्यावर बाजू मांडण्यास सांगण्यात आले होते.

त्यावर बाजू मांडताना उपजिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या परवन्यानुसार उल्लंघन होणार नाही याचे भान ठेवूनच संगीत पार्ट्या आयोजित करण्यात येतात अशी बाजू मांडली आहे. शॅक मालकाने केलेला गुन्हा गंभीर असल्याने त्याचा परवाना रद्द करण्याची विनंती याचिकादाराचे वकील नाजेल डिकॉस्ता यांनी खंडपीठाला केली.

म्हापसा उपजिल्हाधिकाऱ्यांनी शॅकमालकांना कारणेदाखवा नोटीस बजावून त्यावरील सुनावणी सुरू आहे. सुनावणी प्रलंबित असताना पुन्हा ध्वनिप्रदूषणाचे प्रकार घडल्याने गोवा खंडपीठाने त्याची गंभीर दखल घेतली आहे. याप्रकरणी शॅकमालकांना पुन्हा कारणेदाखवा नोटीस बजावण्याचे निर्देश उपजिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT