मोरजी: गोव्यात निवडणूकीचे वारे वाहू लागले आहे. अशातच पेडणे मतदार संघात उमेदवारीसाठी संघर्षही बघायला मिळतो आहे. "पेडणे मतदार संघातून (Constituency) मला सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचा पाठींबा मिळत आहे. मी स्थानिक उमेदवार आहे. मला भाजपाची (BJP) उमेदवारी मिळावी यासाठी प्रत्येक गावातील भाजपचे जेष्ठ कार्यकर्त्ये कार्यरत आहेत. मला भाजपची उमेदवारी मिळो अथवा न मिळो, मी निवडणुकीच्या (Election) रिंगणात उतरणार आहे. विजयी झाल्यानंतर कोणत्या पक्षाला पाठिंबा द्यायचा हे स्वाभिमानी पेडणेकर ठरवणार," असल्याचा दावा मिशन फॉर लोकलचे अध्यक्ष राजन कोरगावकर (Rajan Korgavkar) यांनी स्थानिक पत्रकारांकडे बोलताना केला.
"मी स्थानिक म्हणून पेडणे या मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी समस्त पेडणेकर जनतेच्या आग्रहास्तव व पाठींब्यावर पुढे आलेलो आहे. स्थानिक असल्यामुळे पेडण्यातील ज्वलंन्त sसमस्यांची मला पूर्ण जाणीव आहे. पेडण्यातील स्थानिक उमेदवार असल्यामुळे मला सर्व पक्षीय कार्यकर्ते, हितचिंतक, मित्रमंडळी, व महिला कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त पाठींबा लाभत असून मी सर्व पेडणेकरांचा मनापासून आभारी आहे. मी तमाम पेडणेकरांना बांधील असून एवढंच सांगू इच्छितो की, या पुढे माझी वाटचाल पेडण्यातील कार्यकर्ते व जनतेच्या मार्गदर्शनानुसार आणि इच्छेनुसार केली जाईल. मला खात्री आहे की पेडण्यातील जागरूक नागरिक व जनता विरोधकांनी चालवलेल्या कुठल्याही भूलथापांना बळी पडणार नाही," असे आश्वासनही त्यांनी पत्रकारांशा बोलतांना दिले.
"विरोधकांनी माझा संबंध इतर पक्षांशी जोडून पेडणेकरांच्या मनात शंका निर्माण करण्याचा हास्यपद प्रयत्न केला आहे, पण ह्या विरोधकांच्या भूलथापांना पेडणेतील तमाम मायबाप बळी पडणार नाही याची मला पूर्ण खात्री आहे", असे म्हणत विरोधकांना त्यानी प्रतीउत्तरही दिले आहे.
"यंदा पेडणे मतदार संघातून स्थानिक उमेदवाराला प्राधान्य देण्यासाठी स्वाभिमानी पेडणेकर आग्रही दिसत आहेत. म्हणूनच मी निवडणूक रिंगणात उतरत आहे," असे राजन कोरगावकर म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.