Goa CM Pramod Sawant
Goa CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Goa Rape Case: रघुपती राघव राजाराम, प्रमोदाक सद्‍बुध्दी दे भगवान

दैनिक गोमन्तक

साखळी : अल्पवयीन मुलींवरील बलात्काराविषयी (Rape case) केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी काँग्रेसने आयोजित केलेल्या ‘सद्‍बुध्दी यात्रे’ला रविवारी साखळीत वेगळेच वळण लागले. डिचोली, साखळी मतदारसंघातील भाजपचे हजारो कार्यकर्ते येथे जमल्याने तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी (Goa Police) काँग्रेस (Congress) व भाजप (BJP) कार्यकर्त्यांना अडवले. काँग्रेस कार्यकर्ते पुढे जाण्याचा प्रयत्न करीत असल्याचे पाहून बळजबरीने काही कार्यकर्त्यांना वाहनातून नेण्यात आले. मुख्यमंत्र्यांच्याच गावात हजारोंच्या उपस्थितीने कोरोना नियमांची पायमल्ली झाली. (Whenever Goa CM Sawant is scared he Forward to police)

बाणावली येथे अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्कारासंदर्भात विधानसभेत डॉ. प्रमोद सावंत यांनी विधान केले होते, की सरकारबरोबर पालकांनीही आपल्या मुलींची जबाबदारी घ्यावी. या वक्तव्यावर काँग्रेसने तीव्र संताप व्यक्त केला होता. या वक्तव्याला विरोध म्हणून काँग्रेसने साखळीत ‘सद्‍बुध्दी यात्रा’ आयोजित केली होती. सावंत यांच्या निवासस्थानी जाऊन मेणबत्ती पेटवून त्यांना फुले द्यावीत, अशी कार्यक्रमाची रूपरेषा होती. मात्र, संपूर्ण डिचोली व साखळी मतदारसंघातील भाजपचे कार्यकर्ते मुख्यमंत्र्यांच्या विधानाचे समर्थन करून काँग्रेसच्या यात्रेला विरोध करण्यासाठी जमू लागले.

जब जब सावंत डरता है...

डिचोली तालुका उपजिल्हाधिकारी दीपक वायंगणकर यांनी पोलिसांना आवाहन केल्यानंतर पकडलेल्या सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी सोडले. काँग्रेस कार्यकर्त्यांना पुढे जाऊ देत नसल्याने त्यांनी रस्त्यावरच ठाण मांडून ‘रघुपती राघव राजाराम, पतीत पावन सीताराम.. प्रमोदाक सद्‍बुध्दी दे भगवान.. चलयांक संरक्षण दे भगवान’ असे रचलेले भजन गाण्यास सुरुवात केली. तसेच ‘जब जब सावंत डरता है, पुलिसको आगे करता है’, ‘इन्क्लाब जिंदाबाद’, अशा घोषणा दिल्या.

काय म्हणाले काँग्रेस कार्यकर्ते

धर्मेश सगलानी म्हणाले, बलात्कारासारख्या घटना घडल्या तर गोव्याची सुरक्षितता धोक्यात येईल व खाण व्यवसायापाठोपाठ पर्यटन व्यवसायही बंद पडेल. मुख्यमंत्र्यांनी बेजबाबदार विधान न करता गोव्याच्या सुरक्षेकडे लक्ष ठेवावे. सुनीता वेरेकर म्हणाल्या, सरकार पोलिस खात्याचा वापर स्वत:च्या मंत्र्यांसाठीच करीत आहे.

परवानगी किती लोकांना?

साखळीत काँग्रेसच्या ‘सद्‍बुध्दी यात्रे’ला सुमारे 100 लोक जमले तर या यात्रेला विरोध करण्यासाठी भाजपचे दोन हजारांहून अधिक कार्यकर्ते साखळीत जमा झाले होतो. कोविड अद्याप संपलेला नसताना हा धोका पत्करणे बरोबर आहे का? पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था हाताळताना दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना दोन्हीही बाजूंनी अडवून ठेवले, परंतु कर्फ्‍यू पूर्णपणे उठवलेला नसताना यात्रेसाठी किती लोकांची परवानगी होती? कोविड विरोधी कायदा धाब्यावर बसवून एवढे लोक जमविण्यास कोण जबाबदार? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Loksabha Election 2024: ‘’भ्रष्टाचार, वॉशिंग मशिनचे राजकारण थांबवण्यासाठी अन्...’’; गोव्यातून शशी थरुर यांचा भाजपवर हल्लाबोल

Arjun Parab Passed Away: ज्येष्ठ प्रसिद्ध साहित्यिक अर्जुन परब यांचे निधन

Amit Shah In Goa: केटामाइन ड्रग, सिद्धी नाईक मृत्यू प्रकरण आणि म्हादई; काँग्रेसचे शहांना तीन प्रश्न

Bodgeshwar Temple Theft: बोडगेश्वर मंदिरात चोरी करणारी टोळी जेरबंद; चौघांना सावंतवाडीतून अटक

UEN For Goa Students: गोव्यात बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मिळणार पर्मनंट एज्यूकेशन नंबर, कसा होणार फायदा?

SCROLL FOR NEXT