Goa Beach Dainik Gomantak
गोवा

Goa Beach: गोव्याच्या एका किनाऱ्यावरील हे दृश्य कधी बदलणार?

Goa Beach: गोव्याच्या एका किनाऱ्यावरील हे दृश्य आहे. कावळे-कचर्‍याच्या संगतीत योग साधनेत मग्न झालेल्या या छायाचित्रातील पुरुषाचे कौतुक करायचे ठरवले तरी त्याच्या आसपास माजलेल्या उकिरड्याला नजरेतून हटवणे शक्य आहे काय?

दैनिक गोमन्तक

Goa Beach:

गोव्याच्या एका किनाऱ्यावरील हे दृश्य आहे. कावळे-कचर्‍याच्या संगतीत योग साधनेत मग्न झालेल्या या छायाचित्रातील पुरुषाचे कौतुक करायचे ठरवले तरी त्याच्या आसपास माजलेल्या उकिरड्याला नजरेतून हटवणे शक्य आहे काय? की तो उकिरडा नजरेआड होण्यासाठी डोळे बंद करून ध्यानमग्न होणे श्रेयस्कर असेच तर त्या पुरुषाने ठरवणे असेल का?

मिळेल तिथे कचरा फेकणे हा जणू आपला जन्मसिद्ध हक्क असल्याप्रमाणे अनेक जण आज वागताना दिसतात. घरातून कामावर जाताना प्लास्टिकची पिशवी भरून कचरा न्यायचा व वाटेवर एखाद्या ठिकाणी (दुचाकीवरून किंवा गाडीतून न उतरता) बिनदिक्क्तपणे फेकून द्यायचा हा आज अनेकांच्या दिनचर्येचा भाग बनला आहे.

रस्त्याच्या कडेला असलेले शेत, रिकामे प्लॉट, नदी-नाले हे सारेच या घरगुती कचऱ्याचे टार्गेट बनत चालले आहेत. कचरा फेकल्यानंतर, तो दृष्टीआड झाला म्हणजे नाहीसा झाला असेच कचरा फेकणारी माणसे समजत असावीत काय? शाळा-कॉलेजमधून, जाहिरातीतून कचरा विरोधी मोहीम सातत्याने चालवल्या जात आहेत पण त्याचा अपेक्षित परिणाम होताना दिसत नाही.

कचरा फेकताना एखाद्याला हटकल्यास, ‘कचरा फेकणारा मी एकटाच आहे काय?’ असा प्रतिप्रश्न करून तो माणूस जणू आपला अपराध सहजपणे झटकून लावतो. मार्गावर रस्त्यावरचा कचरा उचलणारे कामगार नित्य दिसतात पण शिरच्छेद होणाऱ्या रावणाच्या मानेवर डोकी पुन:पुन्हा उगवत राहावीत तसा कचरा पुन्हा पुन्हा रस्त्याच्या कडेला उगवत राहतो.

काही ठिकाणी तर रस्त्याच्या कडेला साचलेले कचऱ्याचे ढीग हे आता लँडमार्क बनले आहेत. ‘अमुक अमुक ठिकाणचा कचऱ्याचा ढीग ओलांडून पुढे गेलात की तुमचे ठिकाण आलेच म्हणून समजा’, अशा प्रकारचे मार्गदर्शन वाटसरूंना मिळायला लागले आहे.

हा सर्वत्र पसरून राहिलेला कचरा कशाचा निदर्शक असावा? या वसुंधरेबद्दल दिवसेंदिवस उदासिन होत जाणाऱ्या आपल्या प्रवृत्तीचा तर तो निदर्शक नसेल? की हा कचरा आपल्या अस्तित्वाचा भाग बनला आहे अशा समजुतीतून आलेला तो बेफिकीरपणा असेल? या छायाचित्राकडे आपण कोणता विचार करत पाहत रहावे?

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Moon Eclipse: खगोलप्रेमींसाठी अविस्मरणीय क्षण! गोव्याच्या आकाशात लाल चंद्र दिसणार का?

Goa Badminton: पश्चिम विभागीय बॅडमिंटन स्पर्धेची चुरस! गोव्याच्या रेहानीला रौप्य, भगतला ब्राँझपदक

Ganesh Visarjan: ..गणपती निघाले गावाला, चैन पडेना आम्हाला! ‘पणजीच्‍या राजा’ची भव्‍य मिरवणूक; राजधानीत ढोल-ताशांचा दणदणाट

Ministers Wealth: देशातल्या मंत्र्यांकडे पैसेच पैसे! भाजपमध्ये 14 अब्जाधीश, काँग्रेस दुसऱ्या क्रमांकावर; वाचा ADR Report

Goa Cricket Coach: गोवा सीनियर महिला क्रिकेट प्रशिक्षकपदी नेहा तंवर! T-20 स्पर्धेने मोहिमेस होणार सुरवात

SCROLL FOR NEXT