Goa Covid-19  Dainik Gomantak
गोवा

Goa Covid-19: सांग सांग भोलानाथ, कोरोना जाईल काय?

कोरोनाने (Covid-19) यंदा दहावी व बारावी विद्यार्थ्यांचे ‘कल्याण’ केले. त्यामुळे यंदा दहावी व बारावीत शिकणाऱ्या मुलांना त्याचा हेवा वाटणे स्वाभाविकच आहे.

दैनिक गोमन्तक

सांग सांग भोलानाथ...पाऊस पडेल काय...? हे गीत सर्वांच्या परिचयाचे आहे. मात्र, गेल्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थी (Students) नवे गीत म्हणत आहेत. ‘सांग सांग भोलानाथ, कोरोना (Covid-19) यंदा जाईल काय?’ असे ते गीत. कोरोनाने यंदा दहावी (10th) व बारावी (12th) विद्यार्थ्यांचे ‘कल्याण’ केले. त्यामुळे यंदा दहावी व बारावीत शिकणाऱ्या मुलांना त्याचा हेवा वाटणे स्वाभाविकच आहे. मात्र, काही वर्षामागे या ना त्या कारणामुळे दहावी व बारावी परीक्षेत नापास झाले होते ते खासगीत आता आपल्या समदुःखी मित्रांशी ‘आमच्यावेळी हा कोरोना मदतीला का धाऊन आला नाही’ असे बोलू लागले आहेत. (When will corona virus leave Goa)

कारण त्यांनाही कुणकुण लागली आहे. वर्षभर ऑनलाईनच्या एकाही वर्गाला हजेरी न लावलेल्या विद्यार्थ्यांनाही कोरोनाचा वरदहस्त लाभला. त्यामुळे ही लॉटरी लागण्यासाठी काही समदुःखी विद्यार्थी पुन्हा शाळेत ॲडमिशन करण्याची शक्यता नाकारता येत नाही.

दरम्यान गोव्याच्या (Goa) संचारबंदीत (Curfew) अजून 8 दिवस वाढ करण्यात आली आहे. राज्यातली संचारबंदी 26 जुलै पर्यंत राहणार आहे. मात्र, मागील संचारबंदी आदेश कायम ठेवण्यात आला आहे. त्यामुळे कॅसिनो (Casinos in Goa), मसाज पार्लर व्यावसायिकांचा अपेक्षाभंग झाला आहे. या सगळ्यात शाळा आणि महाविद्यालय बंदच राहणार आहेत.

काय राहणार चालू, काय राहील बंद

- राज्यातल्या जिम 50% च्या क्षमतेने चालु राहतील.

- दुकाने आणि शॉपिंग मॉल सकाळी 7 ते संध्यकाळी 6 पर्यंत चालू राहतील.

- शाळा आणि महाविद्यालय राहणार बंद

- चित्रपटगृहे पण बंद राहणार

- धार्मिक स्थळे खुली होणार; मात्र 15 पेक्षा जास्ती लोकांना परवानगी नाही

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

जगाचा नकाशा अचूकतेने मांडण्याच्या UN च्या प्रस्तावाला भारताचा पाठिंबा, पण J&K आणि लडाखच्या सीमांबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिला स्पष्ट इशारा

Keri Ambulance Service: केरीला मिळाली 3 दिवसांत 108 रुग्णवाहिका; विधानसभेत आरोलकरांनी प्रश्न उपस्थित करताच सरकारची कार्यवाही

Accident Death: दारूची नशा बेतली जीवावर; दुचाकीवरील ताबा सुटला, नाल्यात पडून 30 वर्षीय युवकाचा मृत्यू

Bank Job: SBI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! 12,000 जागांसाठी होणार मेगाभरती, 250 नव्या शाखा सुरू करण्याचा बँकेचा प्लॅन

Congress Dalit Tribal Support: दलित-आदिवासींची साथ मिळवणे काँग्रेससाठी सोपे नाही! राहुल गांधींसमोर मोठे राजकीय आव्हान

SCROLL FOR NEXT