Goa Congress Loksabha Candidate Dainik Gomantak
गोवा

Goa Congress: बाराव्या यादीतही गोव्याच्या उमेदवारांचा पत्ता नाही, पणजीतील काँग्रेस कार्यालय सामसूम!

Goa Congress Loksabha Candidate: उमेदवार जाहीर होत नाहीत, तोपर्यंत प्रभारींचे पाय गोव्याच्या भूमीवर पडणार नाहीत, अशी चिन्हे आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Congress Loksabha Candidate

निवडणूक मग ती कोणतीही असो राजकीय पक्षाचे कार्यालय गजबजलेले असते. कार्यकर्त्यांची ये जा असते. कोणत्‍या भागात पक्ष बळकटीसाठी काय केले पाहिजे याचे संवाद कानावर पडतात. छोट्या छोट्या बैठका सुरू असतात, पण या साऱ्याला अपवाद आहे ते कॉंग्रेसचे कार्यालय! पत्रकार परिषदेवेळी पत्रकारांचा राबता सोडल्यास या कार्यालयात सध्या सामसूम आहे, असे म्हणणे अतिशयोक्तीचे ठरणार नाही.

पणजीत फेरीबोट धक्क्यासमोरील इमारतीत ‘कॉंग्रेस हाउस’ नावाने ओळखले जाणारे कॉंग्रेसचे कार्यालय आहे. एरव्ही तेथे निवडणुकीदरम्यान कार्यकर्त्यांचा राबता असायचा. दिल्लीतून आलेल्या नेत्यांचे राज्यातील विविध भागातील दौरे तेथेच ठरत. गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे यांचा मुंबई-दिल्ली-मुंबई असा दौरा सुरू आहे.

जोपर्यंत उमेदवार जाहीर होत नाहीत, तोपर्यंत प्रभारींचे पाय गोव्याच्या भूमीवर पडणार नाहीत, अशी चिन्हे आहेत.

शुक्रवारचा मुहूर्त साधणार!

काँग्रेसची दोन नावे कधी जाहीर होतात, याकडे आता केवळ काँग्रेसच्याच नेत्यांचे लक्ष लागल्याचे दिसते. ‘इंडिया’ आघाडीच्या घटक पक्षांनी आपल्यापरीने प्रचार सुरू केला आहे, तर काँग्रेसचे पदाधिकारी उमेदवार जाहीर करण्याची मागणी करीत आहेत.

दुसऱ्या बाजूला भाजपने प्रचाराला जोर धरला आहे. काँग्रेस येत्या शुक्रवारचा मुहूर्त साधणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे, परंतु काहींच्या मते पक्ष तीन मुहूर्तांपैकी गुढी पाढव्याचा मुहूर्त साधू शकतो.

प्रदेशाध्यक्ष आजारी

सध्या उन्हामुळे किरकोळ आजारांचे प्रमाण वाढले आहे. उष्म्यामुळे थंडी-खोकला, अशक्तपणा असे आजार जडत आहेत, अशाच आजाराने गेल्या काही दिवसांपासून प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर त्रस्त आहेत.

दिल्लीवरून परतल्यानंतर त्यांची तब्येत बिघडल्याने त्यांनी काही काळ मोबाईल बंद ठेवला होता. त्या काळात ‘इंडिया’ आघाडीच्या घटक पक्षांची बैठक पार पडली होती, त्यावेळी त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नव्हती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT