Hotel Silver Sand Dainik Gomantak
गोवा

हॉटेल 'सिल्व्हर सँड'वर कारवाई कधी होणार?

प्रश्‍‍न अनुत्तरीतच: ‘सिल्‍वर सँड’चे आयुष्‍य वाढतेय

दैनिक गोमन्तक

मडगाव: प्रथम उच्च न्यायालयाने व आता सर्वोच्च न्यायालयानेही कोलवा येथील ‘सिल्वर सँड’ हॉटेल जमीनदोस्त करण्याचा आदेश दिल्याने कारवाईचा मार्ग मोकळा झाला असला तरी ही कारवाई नेमकी कधी होईल, या प्रश्नाचे उत्तर मात्र अजून मिळालेले नाही. कारण दक्षिण गोवा जिल्हा प्रशासन व सार्वजनिक बांधकाम खाते यांनी ते ठरवायचे आहे.

गोवा किनारी विभाग व्यवस्थापन प्राधिकरणाने बेकायदा घोषित केलेले हे बांधकाम पाडण्यासाठी 7 एप्रिल रोजी सर्व तयारी केली होती, पोलिस बंदोबस्तही ठेवला होता. पण साबांखाचे पथक फिरकलेच नाही, त्‍यामुळे कारवाई होऊ शकली नाही.

सदर कारवाईसाठी सुमारे चौदा लाख रुपये खर्च येणार आहे. या खर्चाची तरतूद न केल्याने साबांखाने पुढाकार घेतला नाही असे नंतर सांगितले गेले. पण प्रत्यक्षात या कामासाठी कुशल व अनुभवी एजन्सीची गरज असल्याने त्या दिवशी ते होऊ शकले नाही असे समजते. आता तशी विनंती करणारा तसेच निधीची तरतूद करण्याची मागणी करणारा लेखी प्रस्ताव साबांखाने जिल्हा प्रशासनाला सादर केलाआहे.

दरम्यान, या प्रकरणातील तक्रारदार असलेल्या ज्युडीथ आल्मेदा यांनी ७ एप्रिलचा फार्स टाळण्यासाठी किनारी व्यवस्थापन विभागाकडे स्वतःचे पथक असण्याची गरज प्रतिपादली आहे. तर, कोलवा सिव्‍हिक फोरमने मुख्य सचिवांना या प्रकरणात पावले उचलण्याची मागणी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli: क्रिकेट विश्वात खळबळ! 'हा माझा शेवटचा वनडे वर्ल्ड कप', भारत-वेस्टइंडिज मालिकेपूर्वी किंग कोहलीनं फोडला मोठा बॉम्ब

Goa Agriculture: पिकलेल्या भातशेतीसमोर मोठे संकट, हार्वेस्टिंग मशीनची प्रतीक्षा; मांद्रे-कोरगाव हद्दीतील पीक वाया जाण्‍याची भीती

Asian Games 2026: गोल्डन गर्लज्! रोमहर्षक लढतीत भारताच्या पोरींनी मारली बाजी; इराणची धूळधाण करत पटकावलं 'सुवर्णपदक' VIDEO

Stray Cattle: होंडा-वाळपई मार्गावर भटक्या गुरांचा सुळसुळाट, रात्रीच्‍या वेळी रस्त्यावर ठाण; अपघातांना आमंत्रण, दुचाकीस्‍वारांना धोका

Patto Bridge Security: पाटो पुलावरील सुरक्षेच्या त्रुटींवर 'मानवाधिकार'ची तंबी; सीसीटीव्ही, पथदिवे आणि 24 तास पोलिस गस्तीचे निर्देश

SCROLL FOR NEXT