GMC Dainik Gomantak
गोवा

GMC: 'पेशंट लास्ट स्टेजला पोहोचल्यावर...', खाजगी रुग्णालयांबाबत आरोग्यमंत्री राणे काय म्हणाले?

आवश्यकता भासल्यास अशा रुग्णालयांचे परवाने देखील निलंबित केले जातील - राणे

गोमन्तक डिजिटल टीम

काही खाजगी रुग्णालये त्यांच्याकडे उपचारासाठी आलेल्या रुग्णांवर शेवटच्या टप्प्यापर्यंत उपचार करतात आणि नंतर त्यांना जीएमसीकडे पाठवतात. परिणामी रुग्ण औषधोपचारांना आवश्यक तसा प्रतिसाद देत नाही.

रुग्णाची प्रकृती खालावलेल्या परिस्थितीत जी खाजगी रुग्णालये रुग्णांना जीएमसीकडे पाठवतात त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल असे आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांनी स्पष्ट केले.

तसेच आवश्यकता भासल्यास अशा रुग्णालयांचे परवाने देखील निलंबित केले जातील असा इशारा त्यांनी दिला.

खोतोडे पंचायतीच्या मेगा मेडिकल कॅम्पमध्ये राणे बोलत होते. ग्रामीण भागात आयोजित ‘मेगा मेडिकल कॅम्प’ द्वारे तेथील लोकांना आपल्या आरोग्य तपासणीची संधी उपलब्ध करून त्यांना योग्य दर्जेदार सेवा देण्याची प्रयत्न केला जात आहे.

त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी आरोग्य शिबिरातून मिळणाऱ्या आधुनिक आरोग्य सुविधांचा लाभ घ्यावा , असे आवाहन आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांनी केले आहे.

गोव्याच्या आरोग्य क्षेत्रात अत्याधुनिक सुविधा उपलब्ध झालेल्या आहेत.यामुळे आज गोवा मेडिकल कॉलेजच्या एकूण कारभारावर जनतेचा विश्वास वाढलेला आहे. दररोज ‘जीएमसी’मध्ये उपचारासाठी रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे.

थोडक्यात यंत्रणेवरचा विश्वास वाढल्याचे यामधून सिद्ध होते असल्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT