Mapusa Municipality : पार्किंग झोनमधील अनधिकृत विक्रेत्यांना हटविले; म्हापसा पालिकेची कारवाई

सोमवारपासून अतिक्रमणविरोधी मोहिमेची शक्यता
Mapusa Municipal Council
Mapusa Municipal CouncilDainik Gomantak
Published on
Updated on

येथील मार्केटमधील आरक्षित पार्किंग झोनमधील अतिक्रमणांवर कारवाई करून म्हापसा पालिकेने बेकायदा विक्रेत्यांना हटविले. यासंदर्भात माध्यमांनी पालिका मार्केट समितीच्या अध्यक्षांचे या गैरप्रकाराकडे लक्ष वेधताच पालिकेने ताबडतोब या अनधिकृत विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई केली.

प्राप्त माहितीनुसार, चणेकर लेनमधील पाठीमागील बाजूस दुचाकी वाहनांसाठी पार्किंगसाठी जागा अधिसूचित आहे. या जागेत बसून विक्री करणे निषिद्ध आहे असे असताना चार विक्रेत्यांनी या दुचाकी पार्किंग झोन क्षेत्रात आपले बस्तान मांडले होते. यामध्ये तीन कापड व एका भांड्याच्या दुकानदाराने खाट मांडून हा रस्ता व्यापला होता.

Mapusa Municipal Council
Panaji Hit And Run Case: जवळ आले होते बहिणीचे लग्न, त्यापूर्वीच भावाचा पणजीत 'हिट ॲण्ड रन' प्रकरणात मृ्त्यू

दरम्यान, सध्या मार्केट परिसर तसेच पालिका कार्यक्षेत्रात अनेक अनधिकृत विक्रेत्यांनी जागा अडवून आपले बस्तान मांडले आहे. या गैरप्रकारामुळे वाहतुकीवर परिणाम होत आहे. रस्त्याशेजारी अनेक फळ तसेच इतर विक्रेत्यांकडून मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे.

याची दखल घेत, अलीकडेच पालिका मुख्याधिकारी अमितेश शिरवईकर यांनी पालिकेकडून अतिक्रमण मोहीम राबविली जाईल, अशी जाहीर नोटीस काढली होती. १ एप्रिल रोजी ही जाहिरात प्रसिद्ध झालेली. त्यामुळे सोमवारपासून पालिकेकडून ही मोहीम राबविली जाण्याची शक्यता आहे.

Mapusa Municipal Council
Sanquelim Municipality Election : साखळी पालिकेसाठी भाजप-काँग्रेसमध्ये चढाओढ; उमेदवार निश्चितीची घाई

ताबडतोब कारवाई

यासंदर्भात म्हापसा पालिका मार्केट समितीचे अध्यक्ष आशीर्वाद खोर्जुवेकर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी चौकशी करून कारवाई केली जाईल, असे सांगितले.

त्यानुसार, लगेच दहा मिनिटांमध्ये पालिका कर्मचाऱ्यांमार्फत संबंधित अनधिकृत विक्रेत्यांना या जागेवरून हटविण्यात आले. तसेच संबंधितांचा माल जप्त केल्याची माहिती त्यांनी संपर्क साधून छायाचित्र पाठवून दिली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com